पान:रुपया.pdf/16

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( ११ )

बेतली. परंतु रुपये दिले असतां पौंड देण्यास मात्र सरकार या कायद्याने बांधले नव्हते. अशा रीतीने सोन्याचे नाणे प्रचलित झाले.

 हुंडणावळीच्या फरकामुळे हिंदुस्थान सरकारची स्थिति अतिशय काळजी करण्यासारखी झाली होती. तथापि पुष्कळ तज्ज्ञांचे मत असे होते की, रुप्याचे नाणे ठेवणे हेच हिंदुस्थानास श्रेयस्कर आहे. या विरुद्ध मतांचे दिग्दर्शन करणे जरूर आहे. सर जेम्स वेस्टलंड ( काँपट्रोलर ) यांचे म्हणणे असे होते कीं

 होमचार्जेसशिवाय हिंदुस्थानास सोन्याशी कांहींएक कर्तव्य नाहीं. जोपर्यंत हे पैसे फेडण्याची व्यवस्था उत्तम रीतीने केलेली आहे तोपर्यंत आंतरव्यवहाराकरितां हिंदुस्थानास सोने अनावश्यक आहे. युरोपियन नोकर व व्यापारी यांना इंग्लंडांत पैसे पाठविण्याचे असल्यामुळे त्यांनाच फक्त या प्रश्नाचे महत्व वाटते, रुप्याचे नाणे हे किंमतीच्या दृष्टीने जास्त स्थिर असल्यामुळे हेच चालू ठेवावे.

 सर डेव्हिड बार्बर यांचे म्हणणे असे होते की, सोन्याचे नाणे केल्याने युरोपांत हिंदुस्थानांतील मालाला जी किंमत येईल ती अधिक होईल ही कल्पना भ्रामक आहे.आयात मालाची किंमत निर्यात मालाने फिटत असल्यामुळे, सोन्याच्या नाण्याशीं हिंदुस्थान देशाचे नफानुकसान ग्रथित झालेले नाहीं.या मतांत पुष्कळ सत्य होते, यांत संशय नाहीं.१८७८ मध्ये स्टेट सेक्रेटरी यांनी