पान:रुपया.pdf/168

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६५ )

 आतां त्या सोन्याचा उपयोग चलनांत नाणं ह्मणून केला जात होता किंवा नाही यासंबंधी मात्र दोन मते आहेत. कित्येकांचें ह्मणणें असे आहे की, सोने ऋग्वेदकाळी चलनांत असले पाहिजे, तर दुसन्यांचे मतं सोनं मूल्यवान धातु ह्मणून फक्त अलंकार वगैरे कारणांकरितांच वापरले जात असावे असे आहे. ते कसेही असले तथापि इतर राष्ट्रांच्या मानाने पाहतां, अति प्राचीन काळापासून सोने हिंदुस्थानांत चलनांत असावें एवढं मात्र खरे. महाभारतादि संस्कृत ग्रंथांत यासंबंधी पुष्कळच उल्लेख आहेत. पण दुसरीही एक गोष्ट याचरोवर लक्षांत ठेविली पाहिजे की, सुवर्णचलनासंबंधी उल्लेखांशिव य-गोपवृत्ति समाजांतील लोकां- प्रमाणे-गाई, बेल यांचाही उपयोग पैशाप्रमाणे केल्याचे उल्लेख त्याच ग्रंथांत आढळतात; परंतु त्यांची संगत कालानुक्रमाने लावणे कठिण आहे. हिंदुस्थान देशाच्या विस्तृतपणामुळे व तो एकाच वेळी निरनिराळ्या प्रकारच्या राजे लोकांच्या ताज्यांत असल्यामुळे येथें चलनाची उत्क्रांति सर्व ठिकाणी सारख्या प्रमाणांत झाली असेल असं ह्मणतां येत नाहीं.
 नुकत्याच उपलब्ध झालेल्या " कौटिल्याचें अर्थशास्त्र " यां ग्रंथामुळे चंद्रगुप्तकालीन भारतवर्षाची अर्थशास्त्रांतील प्रगति अत्यंत विस्मयजनक असली पाहिजे असे निदर्शनास येते; परंतु तत्कालीन नाणीं आज उपलब्ध नसल्यामुळे, नाण्यांसंबंधी निश्चित मत देतां येत नाहीं. इसवी सनापूर्वीच्या दोन तीन शतकांपासून मात्र नाणी प्रचागंत असावीत असे खात्रीलायक ह्मणतां येतें.