पान:रुपया.pdf/166

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १६३ ) अमेरिकेची पद्धति सुवर्णचलनाची आहे. डॉलर में मुख्य नाणे येथे चलनांत आहे. सोन्याच्या डॉलरचे वजन २५.८ ग्रेन आहे. रुप्याच्या डॉलरचे वजन ४१२.५ ग्रेन आहे. येथे द्रिचलनपद्धतीच पूर्वी चालू होती आणि सोन्याचे रुप्याशी १ : १५.९८८ असे गुणोत्तर होते; परंतु १८७३ मध्ये रुप्याचे न में पाडणे बंद केले. तथापि १८१८ मध्ये रुपे हे कायदेशीर फेडीचे चलन केले. पुढे १८९० च्या कायद्याने रौप्यचरुनाचे नियमन केले. 3 डॉलर, १ डॉलर, १ डॉलर अथवा डाइम अशी रुप्याची उपनाणी येथे चलनांत आहेत. या शिवाय सेंट वगैरे निकलची किरक ळ नाणी आहेतच. | हिंदुस्थानांतील चलनासंबंधी पाहिले असतां, फार प्राचीन काळापासून हिंदुस्थानांत सोन्याचे चलन असावे असे दिसते. कारण ऋग्वेदांतील कित्येक उल्लेखांवरून सोने त्या काळी माहित असले पाहिजे असे दिसून येते. पुढील ऋचा या दृष्टीने मननीय आहेत. ये अंजिषु ये वाशीषु स्वभानवः स्वक्षु सुकमेषु खादिषु । ऋाया रथेषु धन्वसु ॥ मं. ५/५३।३.