पान:रुपया.pdf/165

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१६२ )

तीची नाणी आहेत. ती २० मार्कपर्यंतच कायदेशीर फेडीचे चलन आहेत. याशिवाय फेनिग वगैरे निकटची किरकोळ नाणी आहेतच. थेलर ह्मणून ३ मार्कच्या किंमतीचे एक जुनें रुप्याचं नाणे जर्मनीत चलनांत आहे व तें अमर्याद प्रमाणांत कायदेशीर फेडीचें चलन आहे. छीं लढाईत जर्मनीचा पराभव झाल्या- मुळे, जर्मनमार्कची किंमत अतिशय उतरली आहे हे वाचकांस माहीत असेलच.
 जपानची चलनपद्धति प्राचीन काळी फार घोंटाळ्याची होती. सन १८७१ मध्ये त्यांत सुधारणा करून, दशांशपद्धतीवर चल- नाची स्थापना केली. येन है मुख्य नाणे १०० सेनचे केले आहे. यावेळी द्विचलनपद्धति जपानांत प्रचलित होती. सोन्याच्या नाण्याचं रुप्याच्या नाण्याशी १ : १६-१७ असे गुणोत्तर होतं. पुढे १८९७ मध्ये द्विचलनपद्धति रद्द करून सुवर्णेकचलनाचा स्वीकार जगनने केला. मुख्य नाणे सोन्याचे २० येनचें आहे व त्याचे वजन सुमारे २५० ग्रेन आहे. याशिवाय १० येनचें, ५ येनचें अशीं सोन्याचीं नाणी आहेतच १८९७ पूर्वी जी सोन्याची नाणी २० येनचीं व १० येनची प्रचारांत होती, त्यांचें वजन हल्लींच्या नाण्यांच्या दुप्पट असल्यामुळे, ती दुप्पट किंमतीने व्यव हारांत चालतात. रुप्याची उपनाणी ५० सेन, २० सेन, १० सेन अशी आहेत. शिवाय निकलची, ब्राँझची, १ सेनचीं, ५ रिनचीं वगैरे किरकोळ नाणीं प्रचारांत आहेतच. सोन्यास टांकसाळ खुली आहे व रुप्याची नाणी सरकार पाडते.