पान:रुपया.pdf/164

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६१ )

कायदेशीर फेडीचं चलन समजली जातात.फ्रान्स, इंग्लंड बगैर परराष्ट्रांशी होणारा व्यापारी हिशेब,सुवर्णचलनावरच केला जातो. फ्रँकची किंमत १५ रुपयांबरोबर किंवा एका पौंडाबरोबर २५.२२१५ फ्रँक अशा प्रकारे सांगतां येते. सेय, रुमानीया, सहिया, बल्गेरिया हीं राष्ट्र जरी लॅटिन युनियन संघांत सामील नाहीत, तथापि त्यांची चलनपद्धति मात्र लॅटिन संघाचे राष्ट्रांप्रमाणेच आहे. ह्मणजे फ्रान्सप्रमाणेच आहे.यावरून जवळ जवळ दक्षिण युरोपमध्ये हीच पद्धति प्रचलित आहे असे ह्मणण्यास हरकत नाहीं. त्याचप्रमाणे संघांत सामील नसलेल्या दक्षिण अमेरिकेतील बऱ्याच राष्ट्रांत ही पद्धति सुरू आहे. चोलिव्हिया, एक्वेडॉर, पेरुं, अर्जेंटाइन रिपब्लिक, वेनेज्युएला हेटी, कोलंबिया, सेंट्रल अमेरिका हीं तीं राष्ट्रे होत. संघाच्या सभा- सदरातसुद्धां नाण्यांचें वजन व शुद्ध धातूंचे प्रमाण इत्यादी - मध्ये जरी ऐक्य असले, तथापि नाण्यांची नांवें देशपरत्वें निर- निराळी आहेत. फ्रँक है फ्रान्सचें, लिए हें इटलीचें, पेसेटा हें स्पेनचे अशीं नाण्यांची नांवे आहेत.
 जर्मनीनें १८७३ मध्यं सुवर्णेकचलनाचा स्वीकार केला आहे. जर्मनीच्या नाण्यास मार्क असे नांव आहे. सोन्याच्या २० मार्कच्या नाण्यांचं वजन १२२.९९७ ग्रेन इतकें हाणजे जवळ जवळ इंग्लिश पौंड इतकेंच आहे. ५ मार्कचें, ३ मार्कचें, २ मार्कचें, १ मार्कचे याप्रमाणे रुप्याची लहान मोठी कृत्रिम किम-