पान:रुपया.pdf/163

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १६० )

शिलिंग हूँ आहे व ते॑ कृत्रिम किंमतीचे आहे. ई. फक दोन पौंडांपर्यंतच कायदेशीर फेडीचें चलन आहे. इतर पेन्स. फार्टिंग जैगैरे किरकोळ नाणी ब्राँझ, निकल बगैरेची आहेत.
 फ्रान्सची चलनपद्धति रंगड्या विचलनाच्या जातीची आहे.
 वर द्विचलनपद्धतीच्या इतिहासांत सांगितल्याप्रमाणे १८६६ मध्ये फ्रान्स, बेल्जम, इटली, स्विरझर्लंड यांनी लॅटिन युनियन नांवाचा संघ स्थापून, १ : १५ असे सोन्या- रुप्याच्या भावाचे गुणोत्तर ठरवून आपल्या देशांत द्विचलनपद्धति चालू ठेविली; पण १८७८ पर्यंतच ती चालू शकली.कारण सुवर्णकचलनचा पुर- स्कार इंग्लंड, जर्मनी, स्वीडन, नार्वे इत्यादि देशांनी केल्यामुळे, रूपें अपकृष्ट होऊन, लॅटिन युनियन संघाच्या राष्ट्रांत येऊ लागले. तेव्हां लॅटिन युनियन संघाच्या राष्ट्रांत १८७८ मध्ये रुप्यास खुली टांकसाळ बंद करणे भाग पडले. तेव्हांपासून २० फ्रँकचें सो- ज्याचे व ५फ्रँकचे रुप्याचें अशी दोन मुख्य नाणी संघाच्या राष्ट्रांत प्रचलित आहेत. २० फ्रँकच्या सोन्याच्या नाण्याचे वजन ९९ ५६३ मेन इतके आहे व ५ फ्रेंकच्या रुप्याच्या नाण्याचे वजन ३८५.८ ग्रेन आहे.या दोन्हीं नाण्यांत, ती लवकर झिजूं नयेत हाणून इंग्लंडांतील पौंडाप्रमाणे थोड्या प्रमाणांत दुसरी धातु मिसळलेली असते. एक फ्रँकचीं वगैरे लहानसहान इतर रुप्याची उपनाणी पुष्कळ आहेत; पण ती ५० फ्रेंकपर्यंतच