पान:रुपया.pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५९ )

 इंग्लंडची चलनपद्धति संमिश्र किंवा सुवर्णैकचलनपद्धतीची आहे. कायदेशीर फेडीचें मुख्य चलन सोन्याचे पौंड अथवा सॉव्हरिन हें आहे. उपनाणी शिलिंग, पेन्स, फार्निंग वगैरे आहेत त रुपें, तांवें, ब्राँझ इत्यादि धातूंची केलेली असतात व हीं किर- कोळ व्यवहारांतच वापरली जातात. पौंडाचें वजन १२३.४४७ ग्रेन ह्मणजे जवळ जवळ ११ आणे भार असतं. आतां यांतील १० आणे भार शुद्ध सोनें असतें व नाणं लवकर झिजूं नये ह्मणून सुमारे एक भार तांब असते; परंतु त्यामुळे पौंडाच्या सोन्याच्या किंमतीत विशेषसा फरक पडत नाहीं. इंग्लंडमध्ये सोन्यास खुली टांकसाळ असल्यामुळे, एक औंस सोनें दिले की, ३ पौंड १७ शिलिंग १०८ पेन्स इतकी नाणी बरोबर पाडून मिळतात व टांकसाळीत हा नाणी पाडण्याचा खर्च सरकार स्वतः सोसतें. आतां टांकसाळींतून नाणी पाडून मिळण्यास थोडासा अवधि लागत असल्यामुळे, लोक बहुवा 'बँक ऑफ इंग्लंड' मध्यें सोने देऊन नाणी घेतात. सोनें घेऊन ताबडतोब नाणी दिल्या - बद्दल 'बँक ऑफ इंग्लंड' व्याज ह्मणून ( हे व्याज पंधरा दिव- सांचें ह्मणून घेतले जातें ) प्रत्येक औंस सोन्यामागे १३ पेन्स कापून घेते. ह्यणजे एक औंस सोन्यास ती ३ पौंड १७ शिलिंग ९ पेन्स इतकींच नाणीं देते. हाफ सॉव्हरिन अथवा अर्ध्या पौंडाचें दुसरें एक सोन्याचे नाणं चलनांत आहे. त्याचें वजन वगैरे सर्व कांही पौंडाच्या अर्ध्या प्रमाणांत आहे. रुप्याचे नाणे