पान:रुपया.pdf/15

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




(१०)

चवथी आंतरराष्ट्रीय परिषद भरली, त्यामध्ये कांहीं निश्चित सिद्धांत न ठरतां शुष्क बाद माजला. अशा रीतीने द्विचलनपद्धतीसारखें अप्रतिम साधन सर्व राष्ट्रांनी आपल्या हातांनी गमविले.

 इतकें झाल्यावर, सोन्याचे नाणे सुरू करावें व रुप्याची खुली टांकसाळ बंद करावी असे हिंदुस्थान सरकारने ठरविले व त्याप्रमाणे स्टेट सेक्रेटरीकडे १८९३ च्या जानेवारीत त्यांनी एक खलिता पाठविला. त्यामध्ये रुपयाची किंमत १८ पेन्स ठरवावाच हिंदुस्थानांत टांकसाळींत पौंड पाडून सुवर्णेकचलनपद्धति सुरू करावी असे आमचे स्पष्ट मत आहे असे त्यांनी जाहीर केल. मामुली पद्धतीप्रमाणे स्टेट सेक्रेटरी यांनी लॉर्ड हर्शेल यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली. या कमिटीच्या सूचना पुढे लिहिल्याप्रमाणे होत्या रुप्याची खुली टांकसाळ बंद करावी; १ रु = १६ पेन्स अशी अबाधित व कायदेशीर हुडणावळ ठरवावी व सोन्याचे नाणे सुरू करावे. या सूचना दादाभाई नौरोजी यांनी प्रतिरोध केला. नंतर १८९३ चा ८ अॅक्ट पास करून, त्याअन्वयें या सर्व सूचना अमलात आणल्या टांकसाळ जरी बंद झाली तरी स्वतः रुपये पाडण्याचा हक्क सरकारने आपल्याकडे राखून ठेविला

 लोकांनी सॉव्हारिन किंवा सोने दिले असता, त्यांना १ पौड १५ रुपये या प्रमाणाने रुपये मिळतील अशी हमी सरकारने