पान:रुपया.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५६ )

लॅटिन युनियन स्थापन केला व त्याचा सुपरिणामही थोडासा दिसून येऊ लागला. फ्रान्सच्या शेजारीच बेल्जम, स्वित्झर्लंड, इटली वगैरे राष्ट्र असल्यामुळे, तेथे चलनांत फ्रेंच नाणींच फार असत; परंतु १८७० साली जे फ्रेंको - जर्मन युद्ध झाले, त्यापासून सर्व दिशा पालटली. या युद्धांत फ्रान्सचा पराजय झाला व १८७१ मध्ये जर्मनीने इंग्लंडचे अनुकरण करून, सुवर्णैकचलनपद्धतीचा स्वीकार केला व फ्रान्सला जर्मनीस जी खंडणी द्यावी लागली, ती सर्व सोन्यांत द्यावी लागली. याचा व एकंदर मध्ययुरोपांत उत्पन्न झालेल्या परिस्थितीचा फायदा घेऊन, जर्मनीनें आपल्या येथील सर्व रुप फ्रान्स व लॅटिन युनियनमधील इतर राष्ट्रांच्या बाजारांत घालविले. त्यामुळे रुप्याची किंमत एकदम फार कमी झाली. १८७२ मध्ये नॉर्वे, स्वीडन, डेनमार्क या राष्ट्रांनी आपापसांत करारनामा करून सुवर्णैकचलनपद्धतीचा स्वीकार केला. या सर्वांचा परिणाम असा होऊं लागला कीं, द्विचलनपद्धति कायम ठेवणे लॅटिन युनियनच्या लोकांस कठिण पडू लागले. लागलें. ह्मणून १८७३ मध्ये लॅटिन युनियनच्या राष्ट्रांनी पांच फ्रँकच्या नाण्यांस खुली टांकसाळ बंद केली व प्रत्येक राष्ट्राने नाणीं ठराविक प्रमाणांत बाहेर काढावी असे ठरविलें.१९७८ मध्ये तर रुप्यास खुली टांकसाळ बंद केली व रुप्याच्या कृत्रिम नाण्याच्या उत्पत्तीचंसुद्धां नियमन केलें. मध्यंतरी १८७६ मध्ये अमेरिकन सरकारने रुप्याच्या चलनासंबंधी एक कमिशन नेमिलें