पान:रुपया.pdf/160

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५७ )

व त्याने द्विचलनपद्धतीचाच पुरस्कार केला. १८७८ मध्ये पुन चलनासंबंधी एक परिषद् भरली; परंतु जर्मनीनें त्यांत भाग घेण्याचें नाकारिलें. इंग्लंडने तोंडी सहानुभूति दाखविण्यापली- कडे काही विशेष केले नाहीं आणि उलट वेल्जम, स्वित्झर्लंड यांनींही सुवर्णैकचलनपद्धति अमलांत आणण्याचें ठरविलं. त्या- नंतर पुनः सन १८८१, १८९२, १८९७ या साली द्विचलन- पद्धतीचा सार्वत्रिक स्वीकार करण्यासंबंधी परिषदा भरवून प्रयत्न करण्यांत आले; परंतु इंग्लंड, जर्मनीसारख्या बलाढ्य व सुसंपन्न राष्ट्रांनीं त्यांस विरोध केल्यामुळे, शेवटी त्यांतून विशेष कांहीं निष्पन्न झाले नाहीं. एवढे मात्र एवढे मात्र लक्षांत ठेवण्यासारखे आहे की, फ्रान्सनें व अमेरिकेने आपल्या देशांत अनेक कायदे पास करून द्विचलनपद्धति कायम राखण्याचे कसून प्रयत्न केले. १८९२, १८९७ च्या परिषदा अयशस्वी ठरल्यानंतरच १८९३, १८९८ साली हिंदुस्थान सरकारने चलनासंबंधी कमिट्या बसवून आपले धोरण मुक्रर केलें. असा विचलनपद्धतीचा थोडक्यांत इतिहास आहे.
 आतां चलनपद्धतीचे जे एकंदर पांच प्रकार आहेत ते पाहू.

 वर सांगितलेल्या सुवर्णेकचलन किंवा संमिश्रचलनपद्धति व द्विचलनपद्धति याशिवाय तुलनात्मक एकात्मक व लंगडी द्विचलन पद्धति असे एकंदर चलनाके पांच प्रकार आहेत.