पान:रुपया.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५४ )

 द्विचलनपद्धतीच्या बाबतीत खरे पाहिले असतां फ्रान्सनें अति- शव पुढाकार घेऊन, ती अस्तित्वांत राहण्याबद्दल खटपट केली; परंतु मोठ्या राष्ट्रांमधील अविश्वास, राजकारण इत्यादीमुळे हे सर्व प्रबल- निष्फळ झाले व जवळ जवळ सुवर्णैकचलनपद्धतीचाच सर्वांनी अवलंब केला. वर सांगितलेच आहे कीं, द्विचलनपद्धति यशस्वी होण्यास व तिचे फायदे सार्वत्रिक अनुभवास येण्यास तिचा सार्वत्रिक निदान सुधारलेल्या सर्व देशांत प्रसार झाला पाहिजे. तेव्हां या पद्धतीचा असा सार्वत्रिक प्रसार गृहित धरून त्यापासूनचे फायदे काय आहेत. ते पाहू. वर जे पैशाचे गुण ह्मणून सांगितले आहेत, त्यापैकी मूल्याचें स्थैर्य हा गुण द्विचन- पद्धतीने जास्ती प्रमाणांत पैशांत येतो.. धातूंच्या उत्पादनामधील कमी जास्ती प्रमाण व त्याचप्रमाणे एकाच धातूवर (एकचलन- पद्धतीच्या वोगानें पडलेली) कमीजास्त प्रमाणांत असलेली मागणी यामुळे उत्पन्न झालेला मूल्याचे स्थैर्यावरील अनिष्ट परिणाम, दोन धातू मुख्य चलनांत असल्या तर, एकीऐवजी दुसरीचा पुरवठा करून नाहींसा करितां येतो. अशा रीहीने चढत्या भावाच्या धातूवर पडणारा मार स्वस्त भावाचे धातृच्या मोबदल्याने नाहींसा होऊन द्विचलनपद्धतीच्या व्यवहारांत समतोलपणा राखला जातो. सोळाव्या शतकाच्या अखेरपर्यंत बहुतेक देशांत द्विचलनपद्धति अमलांत होती; परंतु त्यावेळी राष्ट्राराष्ट्रांत एकी नसल्यामुळे व हल्लीप्रमाणे अर्थशास्त्राची प्रगतिही विशेष नसल्यामुळे त्या पद्ध-