पान:रुपया.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५३ )

 ही झाली एकचलनपद्धतीची व्यवस्था, आतां दोन धातू जर चलनांत असतील झणजे द्विचलनपद्धति जर देशांत सुरू असेल, तर काय होईल ते पाहूं. दोन वातू चलचांत असल्या झणजे साह-- जिकच त्यांमधील गुणोत्तर ठरवावे लागते परंतु दोन धातूंतील घाण्यांच्या किंमतीचे कायदेशीर प्रमाण व त्यांचे बाजारांतील धातुगत किंमतीचे प्रमाण यांत एकवाक्यता पाहिजे तरच द्विचलन- पद्धति चालं शकते. नाही तर दोन धातूंच्या नाण्यांचे चलनांतील मूल्य व बाजारांतील धातुगत मूल्य यांत अंतर पडले की, ग्रेश- सच्या नियमाची क्रिया सुरू होते. आणि दोन्हीपैकी एक ह्मणजे जास्त किंमतीची धातु -- नाणें- चलनांतून नाहीशी होते; अर्थात् परदेशांत जाते. यावरून इतके सिद्ध होते की, सोने च रुप यांच्यांतील बाजारभावांत आणि चलनांतील कायदेशीर किंमतीत ऐक्य पाहिजे. अशा रीतीने या द्विचरनपद्धतीतील अडचणी निरनिराळ्या प्रसंगी बहुतेक राष्ट्रांस आलेल्या होत्या व त्या नाहीशा करून ही पद्धति यशस्वी करण्याकरितां वन्याच राष्ट्रांनी प्रयत्न करूनही पाहेिले; परंतु या पद्धतीच्या सुफलतेचे मुख्यः कारण जे तिचा सार्वशिक स्वीकार, ते सुधारलेल्या राष्ट्रांच्या ऐक्याच्या अभावी घडून आले नाही आणि शेवटी बहुतेकांस सुवर्णैकचलनपद्धतीचाच अवलंब करणे ग्राप्त झाले. येथे द्विचलन- पद्धति रूढ होण्यासंबंधी निरनिराळ्या राष्ट्रांकडून जे प्रयत झाले त्यांचे थोडक्यांत अवलोकन करणे बरे होईल.