पान:रुपया.pdf/155

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५२ )

पाहिजे व ते राखण्याकरितां सरकारास मुक्तद्वार टांकसाळीनी पद्धति अमलांत आणावी लागते. या पद्धतीमध्ये चलनांत वाप रली जाणारी नाणी ज्या धातूच असतात, ती धातू सरकारी टांकसाळीत देऊन, तेवढ्या वजनाची नाणी पाडून मागतां येतात. इंग्लंडमध्ये ही मुक्तद्वारटांकसाळीची सवलत फक्त सोन्याच्या नाण्यां- करितांच ठेविलेली आहे. इंग्लंडमध्ये जर कोणीही एक औंस सोनें टांकसाळीत दिले, तर त्याला त्याची ३ पौंड १७ शिलिंग १० पेन्स ह्याप्रमाणे नाणी पाडून मिळतात व याबद्दल कित्येक राष्ट्रांच्या टांकासळीत नाणी पाडण्याचा खर्च हा जी एक धोडी कसर कापून घेतात, तीसुद्धां इंग्लंडमध्ये घेत नाहीत; परंतु प्रत्यक्ष व्यवहारांत मात्र असे होते की, सरकारी टांकसाळीत काम फार असल्यामुळे, सोनें दिल्यापासून नाणी पाडून मिळण्यास बराच अवधि लागतो. याकरितां लोक बँक ऑफ इंग्लंडमध्येच सोने देऊन नाणी घेतात व ह्रीं अशी ताबडतोब नाणी देण्या- बद्दल बैंक ऑफ इंग्लंड पंधरा दिवसांचें व्याज ह्मणून प्रत्येक औंस सोन्यामागे १÷ पेन्स कसर कापून घेते. लणजे एक औंस सोन्यास २ पॉड १७ शिलिंग ९ पेन्स याप्रमाणे न णी मिळतात. रुप, तांबें इत्यादि धातूंची उपनाणी पाडण्याचा हक्क मात्र सर कारने फक्त आपणाकडेच ठेविला आहे त्याचे कारण वर दिलेच आहे.