पान:रुपया.pdf/154

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५१ )

 चलनांतील मुख्य नाण्यांसंबंधी असा एक नियम आहे की, चलनांतील नाणे जर आटविलें, तर नाण्यांतील धातुगत मूल्य व सरकारी टांकसाळींतील शिक्कयामुळे त्यास प्राप्त झालेले चलनांतील अथवा नागकगत मूल्य यामध्ये नेहमीं एकवाक्यता असली पाहिजे व अशा प्रकारचींच नाणी हल्लीं सुधारलेल्या देशांतून प्रचलित असल्यामुळे बनवट नाणी पाडणें फायदेशीर नाहीं. निद न सुवर्णैकचलनाच्या बाबतींत तरी ही गोष्ट खरी आहे. रुप्याच्या नाण्यांची स्थिति मात्र निराळी आहे. रुप्याचे नाणे हें सांप्रत बहुतेक सुधारलेल्या देशांत उपपैसा हाणून प्रचलित असल्यामुळे, त्याची चलनांतील किंमत, त्याच्या मूळ धातुगत किंमतीपेक्षा ( कायद्यानें पुद्दाम ) पुष्कळच वाढविलेली असते. आतां रुप्याचे नाणें हें उपपैसा (हिंदुस्थानाखेरीज इतर देशांत ) असल्यामुळे, फार थोड्या किंमतीपर्यंतच कायदेशीर फेडीचें चलन असतें अर्थात् ते तयार करण्यापासून फारसा फायदा नाही. येथपर्यंत नाण्यासंबंधी सर्वसाधारण विचार झाला. आतां मुख्य पैसा होण्याच्या नाण्यांत वर सांगितल्याप्रमाणे चलनांतर्गत व धातुगत किंमतीचे ऐक्य असणें अवश्य आहे. कारण मुख्य पैशाचें धातु- गत मूल्य नाणकगत मूल्यापेक्षा अधिक असेल तर नाणीं अट- विली जातील. याच्या उलट जर नाणकगत मूल्य धातुगत मूल्यापेक्षा अधिक असेल, तर नाणी पाडण्याकडे लोकांची प्रवृत्ति होईल. ह्मणून धातुगत व नाणकगत मूल्य यांत ऐक्यच असले