पान:रुपया.pdf/153

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १५०)

बाहेर वजन कमी होते. इकडे नवीं नाणीं टांकसाळीतून बाहेर पडून चलनांत आलेली असतातच त्यामुळे ग्रेशॅमच्या नियमाची क्रिया आपोआप होत राहते. याकरितां नाणे वापरांत राहि- ल्यानें, कायद्याने ठरविलेल्या मर्यादेपेक्षा कमी वजनाचें झालें कीं, पुनः टांकसाळीत पाठविले जावे अशी व्यवस्था सरकार करतें.

 सोळाव्या शतकाच्या अखेरपर्यंत नाणीं हीं बहुतेक ओबड- धोबड स्वरूपांतच चलनांत होतीं. त्यामुळे विशेष रीतीनें लक्षांत न, बेईल अशा प्रकारे नाण्याच्या कडा घांसून किंवा कुरतडून लोक फायदा करून घेत असत; परंतु जसजशी देशांची व्यापार- विषयक प्रगति होऊं लागली, तशी नाण्यांत सुधारणा होऊं लागली. सन १६९६ साली इंग्लंडने ही सुधारणा प्रथम अमलांत आणली. में इतर देशांनी त्यानंतर त्याचे अनुकरण केले. नाण्याच्या बडा घांसल्या जाऊं नयेत अगर अन्य प्रकारें त्यांतील एखादा भाग विकृत करून ओळखतां न येईल अशा रीतीनें धातु काढून घेतां येऊं नये ह्मणून वर्तुळाकार व धारेवर रखे रखे असलेली नाणी पाढण्यात आली. आधुनिक उच्च प्रतीच्या यंत्रसामुग्रीमुळे ठरा- 'देश आकार, वजन, आवाज इत्यादिकांनी युक्त, सुंदर व नाजूक नकशीची अशी नाणी वाटेल तेवढी पाडतां येतात व हे काम सरकारने आपल्या हातीं ठेविल्यामुळे बनावट नाणी करणे फार कठिण झाले आहे.