पान:रुपया.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४९ )

आतां ही नाणी जरी सतेच्या जोरावर त्या त्या देशांत चालत असत: तथापि परदेशांतील व्यापारी मात्र ती नामी वजन करून कस लावून त्यांतील शुद्ध धातूच्या किंमतीइतकीच त्यांची किंमत करीत. निरनिराळ्या राजांच्या कारकीर्दीत लहरीप्रमाणे पाडलेली कायदेशीर कसाची, हिणकस, झिजवट, नवीं अशी नाणी देशांतल्या देशांत कायद्यानं एकाच किंमतीची ह्मणून चालत; परंतु परदेशांतील व्यपारी उत्तम कसाची नवीं नाणी तेवढीं व्यापारांत स्वीकारीत असत. याचा परिणाम असा होत असे की, चलनांतील नवीं चांगली नाणीं तेवढीं बाहेर परदेशांत जात असत व वाईट, झिज- बंद नाणी देशांतल्या देशांत रहात असत. ही वस्तुस्थिति जरी पुष्कळ लोकांच्या लक्षांत त्या वेळीच आली होती तरी एलि- झावेश राणीच्या कारकीर्दीत इंग्लंडांत चलनाच्या प्रश्नासंबंधांत 'ग्रेशम' नांवाच्या एका स्कॉच अधिकान्याने जो रिपोर्ट केला. त्यामध्ये त्याने ही गोष्ट विशेष प्रामुख्याने पुढे आणिल्यामुळे. 'ग्रेशमचा सिद्धांत' या नांवाने ती अर्थशास्त्रात रूढ झाली आहे. हा नियम थोडक्यात सांगावयाचा लणजे 'खोटा पैसा खन्या पैशास बाहेर घालवितो' असं स्मटले असतां पुरें. ग्रेशॅमच्या नियमाप्रमाणे चांगली नाणी चाहेर जाऊन, वाईट नाणी देशांत राहूं नयेत ह्मणून सरकारात नेहमी खबरदारी घ्यावी लागते. कारण नाण्यास स्वाभाविक झीज ह्मणून असतेच. त्यामुळे नाणे चलतांत आल्यापासून कांही वर्षांनंतर त्याचे एका ठराविक मर्यादे-