पान:रुपया.pdf/150

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४७ )

येतात. वर दिलेले हे गुण ज्या द्रव्यांमध्ये दिसून आले, तींच द्रव्यें पैसा ह्मणून चलनांत आली. अर्थशास्त्राच्या तीक्ष्ण कसोटी- प्रमाणे पहातां, पैसा होणाऱ्या पदार्थांत जे गुण अवश्य असावे लागतात, ते सर्व हल्लीं उपयोगांत असलेल्या कोणत्याही द्रव्यां- मध्ये पूर्णपणें वसत नाहीत; परंतु इतर सर्व द्रव्यांपेक्षां धातूंमध्ये हे गुण विशेष प्रमाणांत दिसून आले ह्मणून लोखंड, कथील, तांबे, रुपें, सोनें, प्लॅटिनम् इत्यादि घातू किंवा त्यांचीं मिश्रणें पैसा ह्मणून उपयोगांत आली. पुनः त्यांतही इतर धातूंपेक्षां सोन्या- रुप्यामध्येंच वरील गुण अधिक प्रमाणांत असल्यामुळे,सोन्या- रुप्याचींच नाणी सर्व सुधारलेल्या देशांत हल्ली प्रचारांत आहेत.
 सोनें, रुपें इत्यादि धातु पैसा ह्मणून जेव्हां प्रथम प्रचारांत आल्या, तेव्हां त्या सोन्या-रुप्याचे तुकडे, आंगठ्या, वळीं, गोळे अशा निरनिराळ्या तऱ्हेच्या ओबडधोबड आकारांतच होत्या. परंतु व्यापाराची प्रगति होऊन निरनिराळ्या देशांमधील दळण- वळण जसे वाढू लागले, तसा अशा प्रकारच्या सोन्यारुप्याच्या तुकड्यांना एक प्रकारचा ठरीव आकार देणे भाग पडलें.कारण अशा ओबडधोबड तुकड्यांत लबाडी होण्याचा संभव फार. ह्मणून त्यांचें एका ठरीव पद्धतींत - नाण्यांत रूपांतर झाले.आतां नाण्यांचा थोडक्यांत विचार करूं. पूर्वी हा नाणी पाडण्याचा हक सर्वांसच होता; परंतु धूर्त लोक, नाणीं हिणकस, बनावट वगैरे करून लोकांस फसवित असत. ह्मणून हा हक्क सरकारास