पान:रुपया.pdf/149

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४६ )

आहे. कारण एखादा मोठासा हिरा घेऊन त्याचे जर भाग केले, तर त्या प्रत्येक भागाची किंमत मूळच्या हिन्याच्या किंमतीच्या गुणोत्तरप्रमाणांत असत नाही.
 पैशाच्या अवश्यक गुणांपैकी मूल्याचें स्थैर्य हा गुण अत्यंत महत्वाचा आहे. इतर सर्व पदार्थांचे मूल्य मोजण्याचे परिमाण पैसा है असल्याळे, त्याची किंमत स्थिर असणे अत्यंत अवश्य आहे. एखाद्या इसमानें कांहीं एका ठराविक मुदतीकरितां ह्मणून दुसऱ्या इसमाशी देण्या-घेण्याचा व्यवहार केला तर त्या मुदती- नंतर त्या पूर्वीच्या व्यवहाराचा बरोबर मोबदला देतां किंवा घेतां आला पाहिजे आणि हे होण्यास पैशाची किंमत स्थिर असणे अवश्य आहे हे उघड आहे. नाहींतर घेतांना चाळीस इंची वाराने कापड मोजून घेऊन, परत देतांना पंचवीस इंची वारानें मोजून दिल्याप्रमाणे स्थिति होईल. हा गुण आजपर्यंत सर्वांत सोन्या-रुप्यांतच जास्त प्रमाणांत आढळून येतो. सोन्याची उत्पत्ति दरवर्षी बेताचीच असल्यामुळे, त्याच्या किंमतीत एकदम फेरबदल होत नाही.
 पैशाच्या द्रव्यांतील सातवा गुण अभिज्ञेयता हा होय. पैसा हा नेहमीं व्यवहारांत खेळणारा पदार्थ असल्यामुळे, तो पाहिल्या- बरोबर खरा खोटा हें ताबडतोच ओळखता यावे अशा प्रकारचा गुण त्यामध्ये असावा लागतो. सोन्या-रुप्याची नाणी, त्यांचे रंग, वजन व विशिष्ट प्रकारचा आवाज यामुळे लवकर ओळखतां