पान:रुपया.pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



(९)

याच वेळी रुप्याचा प्रश्न युनायटेड स्टेट्स व लॅटिन युनियन यांनाही त्रासदायक होऊ लागला. रुप्याची किंमत होईल तितकी वर ठेवण्याकरितां युनायटेड स्टेट्सने कायदे पास केले. या कायद्यान्वयें दरसाल एक कोटि तोळे रुपे सरकारने खरेदी केलेच पाहिजे असा नियम होऊन त्याप्रमाणे क्रम सुरू झाला. तथापि रुप्याच्या अवनतीस आळा बसला नाहीं. लॅटिन युनियनने सोने व रुपे ह्या दोनही धातू चलनांत ठेवून द्विचलनपद्धति स्थापण्याचा अकटोविकट प्रयत्न केला; परंतु शेवटी कंटाळून त्यानेही १८७३ साली रुप्याची खुली टांकसाळ बंद केली.

 यानंतर, सर्व देशाच्या ऐकमत्याने द्विचलनपद्धति सुरू करून रुप्याची उन्नति करण्याचा प्रयत्न सुरू झाला. हा प्रयत्न स्तुत्य होता व आमच्या मते, सरतेशेवटी याच मार्गाचा अवलंब सर्व जगास करावा लागेल. तथापि या प्रयत्नास अनेक विघ्ने येऊ लागलीं. सोन्याच्या नाण्याविषयीं युरोपांतील देशांत अधिक प्रीति उत्पन्न झाल्यामुळे रुप्याची उन्नति करण्यास पुष्कळ राष्टें कबूले होईनात. १८७८ मध्ये आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. त्यांत जर्मनी सामील झाले नाहीं. १८७३ मध्ये नॉर्वे व स्वीडन यांनीं सोन्याचे नाणे सुरू केले व १८७६ मध्ये हॉलंडने व १८९२ सालीं ऑस्ट्रियाने सोन्याचे नाणे सुरू केले. हे सर्व देश द्विचलन पद्धतीचे कट्ट द्वेष्टे बनल्यामुळे १८९३ साली जी