पान:रुपया.pdf/148

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(१४५)

शिलकेकडे करितां येत नाही.या वरील कारणामुळेच त्या वस्तू चलनांतून नाहीशा झाल्या व त्यांची जागा सोने, रुपे इत्यादि अनश्वर धातूंनी पटकाविली.
 पैशाच्या द्रव्यांतील चौथा गुण हणजे सजातीयता हा होय. पैसा असणारे द्रव्य सजातीय असले पाहिजे, याचा कोणताही भाग घेतला तरी त्यांत भिन्नता असू नये. सोने, रुप इत्यादि मूल्यवान् धातूंशिवाय हा गुण इतरत्र कचितच आढळती: स्वान्य गुरंदारं, गुलाम वगैरे पदार्थात या गुणांचा अभाव होता ह्मणूनच हे पदार्थ पैसा म्हणून मागे पडले.
 पैशाच्या द्रव्यांतील पांचवा गुण सुविभाज्यता होय. पैशा- सारख्या सर्वमान्य पदार्थांमध्ये हा गुण असणे अवश्य आहे. कारण पैशाच्या द्रव्याचे वाटेल तेवढे लहान मोठे तुकडे व विभाग करितां आले पाहिजेत. पैशाच्या द्रव्याच्या वाटेल त्या लहान वजनाच्या तुकड्यांची किंमत त्याच्या मोठ्या वजनाच्या तुकं- ड्याच्या किंमतीच्या गुणोत्तर प्रमाणांत पाहिजे तरच त्याची लहान मोठी नाणी करता येऊन, पदार्थाचं मूल्य ठरविण्यास सुलभ होते आणि त्यायोगे व्यापारास फार सोयीचे होते. एखादा पौड घेऊन त्याचे जर चार भाग केले, तर त्याच्या प्रत्येक भागाची किंमत पौंडाच्या एकचतुर्थांश असते. हिरा, माणिक कौरे जवा- हिरांत सोन्या-रुप्याचे इतर गुणधर्म जरी असले, तथापि सुविधा- ज्यता हा गुण त्यांत नाही त्यामुळे पैसा होण्यास ते निरुपयोगी