पान:रुपया.pdf/147

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४४ )

धंद्याच्या विलक्षण प्रगतीच्या काळांत जेवढ्या थोड्या वजनांत व आकारांत मूल्य सांठवून इकडून तिकडे नेता येईल तेवढे थोडेच आहे. ह्मणून या दृष्टीने लोखंडापेक्षां तांबे, तांब्यापेक्षां रुपे, कृप्यापेक्षां सोने या धातू चढत्या अनुक्रमाने जास्त किंमतीच्या, उप- योगी व पैसा होण्यास योग्य अशा आहेत; परंतु हल्लीच्या वाढत्या उद्योगधंद्याच्या कालांत सोने, रुपे यांचासुद्धा उपयोग सुवाहातेच्या बाबतीत अडचणीचा व अपुरा पडतो आणि ह्मणून अधात्यात्मक पैशाच्या हागजे कागदी चलनाच्या साधनांचे नवे मार्ग नोटा, चेक्स इत्यादि उपयोगांत आणावे लागले आहेत.
 पैशाच्या द्रव्यांतील तिसरा गुण अविनाश्यता होय. भौतिक शास्त्रज्ञांच्या तीक्ष्ण कसोटीप्रमाणे या जड सृष्टीतील कोणताही पदार्थ जरी अनंतकाल टिकणार नाही; तथापि सापेक्षतेने इतर पदार्थीपेक्षा जे पदार्थ जास्त दिवस टिकतात, तेच या दृष्टीने महत्वाचे होत. सोनें, रुपें या धातू त्यांच्यात असलेल्या निसर्गसिद्ध रासायनिक द्रव्यामुळे गंजून, कुजून, जळून, सुकून इत्यादि प्रकारे नाश पावत नाहीत व त्यांच्यांत बदल न होतां त्या दीर्घकालपर्यंत राहू शकतात. कातडी, शिंपले, कवड्या इत्यादि प्राणिज किंवा तांदूळ, चहा, फळे इत्यादि वनस्पतिजन्य अशा पैशाप्रमाणे वाप- रल्या जाणाऱ्या वस्तूंमध्ये हा गुण नसल्यामुळे, त्या कुजून, किड्न इत्यादि प्रकार नाश पावतात. लोखंड वगैरे कांहीं धातुसुद्धां अंजून वगैरे नाश पावतात. हणून त्यांचा उपयोग संपत्तीच्या