पान:रुपया.pdf/146

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४३ )

याची असते अशा पदार्थांत स्वतःसिद्ध उपयुक्तता व मूल्य असणे हैं स्वाभाविक व जरूरही आहे. समाजाच्या ज्या ज्या स्थितीत जे जे पदार्थ, उदाहरणार्थ, कातड्याचे तुकडे, पिसे इत्यादि पैशाप्रमाणे वापरले जात, त्या त्या वेळी इतर दृष्टीने त्यांची उपयुक्तता होती असे आढळून येते. मृगयावृत्ति समाजांत कातड्यांचा वस्त्रप्रावरणाप्रमाणे शीतनिवारणाकडे उपयोग होत असे. त्याचप्रमाणे गोपवृत्ति समाजांत गुरे ढोरे ही फार उपयोगाची असत. ह्मणून त्यावेळी त्यांचा उपयोग पैशाप्रमाणे होत असे. त्यावरून असे सिद्ध होते की, समाजाच्या निरनिराळ्या स्थितीत पैसा होणान्या वस्तूंमध्ये उपयुक्तता व मूल्य हे धर्म कमी जास्त प्रमाणाने वसत असतात. आजच्या समाजस्थितांत सोने, रुपे इत्यादि मूल्यवान् धातू हे त्यांच्यामध्ये वरील दोन धर्म असल्यामुळे, पैसा ह्मणून उपयोगांत आहेत.
 पैशाच्या द्रव्यांत दुसरा गुण सुवाह्यता किंवा स्थलांतरसुकरता हा असावा लागतो. कारण पैसा हा इकडून तिकडे सहज नेता आला पाहिजे. समजा की, एखाद्या दक्षिणेतील शेतक-यास पंजाबांत कांहीं दिवस राहण्यास जाण्याचे आहे. तर त्यास दक्षिणेतून गहूं पंजाबांत नेण्यास कोण त्रास पडता ? पण तेच गहू, विकून त्यांच्या पैशावर त्यास पंजाबांत जवळ जवळ तेवढाच गहू मिळेल. पैशाच्या सुवाह्यतेचा उपयोग मनुष्यास प्रथम दर्शनी वाटतो त्यापेक्षां तो फार मोठा आहे. हल्लींसारख्या उद्योग-