पान:रुपया.pdf/145

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४२ )

तथापि डॉक्टर, वकील वगैरे धंदेवाल्यांची फी गिनतच ठरविली जाते. इंग्लंडांतून शिकून आलेले कलकत्ता, मुंबई येथील आपले हिंदी डॉक्टर, बॅरिस्टर वगैरे लोक इंग्लंडच्या पद्धतीप्रमाणे आपली फी गिनीतच आकारतात असा अनुभव तेथील रहिवाशांस आहेच. दुसरे एक काल्पनिक उदाहरण आपल्यास घेतां येईल. समजा कीं, कांहींएक कारणामुळे उद्यां रुपया हा चलनांतून एकदम नाहीसा झाला व त्या जागी पांच रुपयांचे एक व आठ आण्यांचें एक अशी दोन नाणीं चलनांत आली. तरी संवयीमुळे लोक पुष्कळसे व्यवहार रुपयांमध्येच ठरवितील असाच संभव जास्त आहे.
 पैशाच्या दुसऱ्या दोन प्रकारांचे वर्णन यथानुक्रमें पुढें येत असल्यामुळे, येथे त्याचा उल्लेख करण्याचे कारण नाहीं. आतां पैसा ह्मणून वापरल्या जाणान्या पदार्थांमध्ये कोणते कोणते गुण अवश्य असावे लागतात, ते कां असावे लागतात याचा संक्षेपतः विचार करूं. चांगल्या पैशामध्ये पुढील सात गुण असावे लागतात असे अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे:-१ उप- युक्तता व मूल्य ; २ सुवाह्यता; ३ अविनाश्यता; ४ सजाती- यता; ५ सुविभाज्यता; ६ मूल्याचें स्थैर्य; ७ अभिज्ञेयता
 पैशामध्यें उपयुक्तता व मूल्य हे गुण अवश्य असावे लागतात. कारण पैशाच्या योगाने मोठमोठ्या किंमतीच्या मालाची उलाढाल होत असते. तेव्हां ज्याने हजारों पदार्थांची अदलाबदल व्हाव-