पान:रुपया.pdf/144

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४१ )

ठरवून बाकीचा सर्व निधि उपयोगात आणतोच. सारांश जगांतील एकंदर पतीच्या व्यवहाराच्या बुडाशी हा पैशाचा निधीच असतो असे आढळून येतें .
 वर एके ठिकाणी सांगितले आहेच की, समाजाच्या व देशाच्या निरनिराळ्या परिस्थितीप्रमाणे अनेक पदार्थ पैसा दाणून उपयोगांत आणले गेले आहेत. परंतु पैता होणाग्या पदार्थीन अवश्य लाग- णाऱ्या त्यांच्या गुणावगुणाप्रमाणे व समाजाच्या वाढत्या गरजा भागविण्याच्या सामर्थ्याप्रमाणे योग्य तेच पदार्थ व साधने पैसा लणून उपयोगांत आली. आतां वर वर्णिलेली कार्ये किंवा कार्यभाग समाजांत ज्या पदार्थाकडून करून घेतली जातात, तो पैसा होय अशा प्रकारे पैशाची व्याख्या करितां येईल. तेव्हां पैशाचे किती प्रकार आहेत ते पाहू. पैसा हा मुख्यतः तीन प्रकारचा असतो. १ व्यावहारिक आणि हिशोबतील; २ धात्वात्मक आणि अधा- स्वात्मक किंवा कागदी; ३ मुख्य पैसा आणि उपौसा.
 १ जो पैसा रोजच्या व्यवहारांत व चलनांत असतो. तो व्यावहारिक पैसा होय. हिशोबांतील पैशाची गोष्ट मात्र निराळी. प्रत्यक्ष व्यवहारांत जरी त्याचे अस्तित्व नसले, तरी हिशोचामध्ये त्याचे अस्तित्व धरले जाते आणि हिशोबात त्याचे अस्तित्व राह ण्याचे कारण एके काळी तो चलनांत असल्यामुळे लोकांस झालेली संवय असावी. याचे उदाहरण आज इंग्लंडमध्ये दिसून येत. गिनी हे वणे आजमितीस इंग्लंडमध्ये चलनांत नाही