पान:रुपया.pdf/143

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १४० )

 विलंबित देवदेवांचे साधन ह्मणून पैशाचा उपयोग सुधारलेल्या समाजांत पतीच्या पद्धतीच्या वाढीपासून होऊ लागला. कारण उत्पादनामध्ये वेळेचा प्रश्न फार महत्वाचा असतो व योग्य वेळी जर पैशाची मदत मिळाली, तर त्याचा उपयोग होऊन पुढे वस्तु पूर्ण होऊन बाहेर पडल्यावर तिच्यावर पूर्वीच्या पैशाची परत फेड करतां येते. उ० पिकास कीड लागली आहे व खत वगैरे उपचार केले तर कोड मरते नाही तर पीक जाते : अशा वेळी कजाऊ काढलेल्या पैशावर पीक सुधरून पुढे ते पूर्ण पदरात पडल्यावर त्याची विक्री करून पैसा परत करण्यास हरकत पडत नाहीं. तेव्हां अशा वेळी कर्जाची रक्कम पैशांतच ठरली असल्यास, देणारा व घेणारा यांस सोईस्कर होऊन नुकसान होण्याचं भीति नसते.
 पैशाचा उपयोगपतीच्या व्यवहारास साधनीभूतनिधि झणून होते. बँकांमधील पतीवर चालणा-या व्यवहारास हा वरील निधीच कारणीभूत असतो. आतां अशा बँकांतील पतीच्या व्यवहारांत पुष्कळ वेळां हा पैशाचा निधि अगदी निरर्थक पडून राहिलेला असतो; परंतु बँकांतील पतीचा व्यवहार खादरच अवलंबून चालत असल्यामुळे, तो निरर्थक शिल्लक पडून राहता असे ह्मणतां येत नाही व त्यातूनही इंग्लंडमधील सुप्रसिद्ध बँकांच्या मॅनेजराप्रमाणे एखादा हुशार मॅनेजर कोणत्या वेळी बँकेत कमीत कमी किती शिल्लक असली तरी चालेल हे आपल्या अनुभवावरून