पान:रुपया.pdf/142

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३९ )

चणीच्या प्रसंगी खुद्द पैशाचाच उपयोग करावा लागतो; पण यासंबंधी जास्त विवरण कागदी चलनाच्या वेळी करण्याचें अस ल्यामुळे त्यासंबंधी जास्त लिहिण्याची आवश्यकता येथें नाहीं.
 विनिमयसुलभता व मूल्याचें सर्वसाधारण परिमाण हीं दोन प्रमुख कार्ये समजलीं ह्मणजे इतर कार्येही आपल्या लक्षांत येतील. पैशाचें मूल्यमापनासंबंधाचें कार्य त्याच्यावरील मूल्याचें, सर्व- साधारण परिमाण या–कार्याशी निगडित असल्यामुळे, त्याविषयीं जास्त विवरण करण्याचे कारण नाहीं. मूल्याच्या मापनाची पद्धति एकदां पक्की ठरली कीं, मोठमोठे व्यापार अगदीं सुलभतेनें पार पाडतां येतात व त्यायोगे औद्योगिक प्रगतीला मदत होते.
 पैसा हा सर्व देशांमध्यें मूल्याचा सांठा समजला जातो. कारण त्यायोगें वाटेल ती वस्तु प्राप्त करून घेतां येते. अतिशय थो- डक्या जागेमध्यें वाटेल तितकी मोठी वस्तु विकत घेण्याजोगी किंमत पैशाच्यायोगें सांठविली जाते. पैशाची किंमत सहसा बदलत नाहीं. तो संग्रही असल्यास, वाटेल ती वस्तु घेण्याचें सामर्थ्य मनुष्यामध्यें असतें. तो इतर वस्तूप्रमाणें संग्रहीं टाक- ध्यानें वाईट होत नाहीं, नासत नाहीं, बिघडत नाहीं, गंजत नाही किंवा कमी होत नाहीं. तेव्हां असा पैसा संग्रहीं ठेवण्याची इच्छा [ हल्लींच्या औद्योगिक भरभराटीच्या कालांत ] मनुष्यास असणे स्वाभाविक आहे.
.