पान:रुपया.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३८)

येतें व असा संकेतित पदार्थ ह्मणजेच पैसा असल्यामुळे प्रत्येक वस्तूचें मूल्य निरनिराळ्या वस्तूशी तुलना करून ठरविण्याचे कारण पडत नाही. एखाद्या इसमानें आपल्या जवळचा माल विकून त्याचे पैसे केले असे आपण नित्य ऐकतों; पण त्याचा अर्थ इतकाच की, त्या इसमानें आपलेजवळील माल देऊन त्याचे मोबदला सोनें, रुपें अगर तांबें यांचे रूपाने दुसरा एक माल घेतला आहे. या रूपांतरित नव्या मालापासून पुढे आपणांस वाटेल ती वस्तु घेतां येईल किंवा अन्य रीतीने ती मोबदला देऊन त्याचा एखादा उपयोग करून घेतां येईल अशी त्याची खातरी असते. हाणजे पैसा हा “ अमक्यानें इतके श्रम केले आहेत त्याचा मोदला त्यास पाहिजे तेव्हां इतका मिळावा " अशा अर्थाचा एक दाखलाच होय असे ह्मणतां येईल. यावरून थोडेसें पुढे जाऊन आपल्यास समाजाच्या अशा एका अत्यंत सुधारलेल्या भविष्यकाळाकडे पाहता येईल की, ज्यावेळी प्रत्येकाच्या श्रमाची न सेवेची जाणीव राखली जाऊन तिचा योग्य मोबदला त्या श्रम करणारास अगर. त्याच्या वारसास कालमर्यादेची सबब न सांगतां देतां येईल. आतां अशा तऱ्हेची स्थिति होण्यास समाजांत परस्पराबद्दल अत्यंत विश्वास असला पाहिजे. अर्थात् सर्व व्यव हार केवळ पतीवर चालला पाहिजे. आजसुद्धां समाजांत पुष्कळ व्यवहार पतीवर चालत आहेत हें खरें; पण या पतीची उभा- रणी चलनांत असलेल्या एकंदर पैशावरच केली असते व अड