पान:रुपया.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( १३७ )

वर उत्पन्न झाल्या असत्या व त्यांची गरजही सारख्याच प्रमाण असती तर ऐनजिनसी अदलाबदलीवर सर्व व्यवहार चालला असता; परंतु हे अशक्य आहे हे स्पष्टच दिसते. वरील ऐनजिनसी व्यवहारातील सौदा जुळविण्याच्या त्रासाशिवाय ज्या पहिजे ती वस्तु एकदम घेतां यावी ही सोय झूणजेच विनिमय सुलभता पैशाच्या योगाने झाली. एखादा पदार्थ पैसा ह्मणून सर्वत्र ग्राह्य झाला वे, सर्वांनाच त्याची गरज लागते. कारण ज्याचेजवळ पैसा असतो, त्यास खात्री असते की, आपण पहिजे ती वन्तु त्याचे बदली घेतां येईल. तसेच ज्याला - पल्या वस्तु दुसन्यास द्यावयाच्या ( विकावयाच्या ) असतात, ल्याला त्याच्या बदली पैसःच घेणे फायदेशीर होते.
 " पेशाचे दुसरे महत्वाचे कार्य ह्मणजे तो मूल्य ३ सर्वसाधारण परिमाण असतो. मृत्य ही कल्पनाच अगोदर सापेक्ष अहे. एखाद्या वस्तूचे मूल्य झणजे तिच्या मददला दुसरी एवादी वस्तु तितक्या प्रमाणांत मिळेल ते असे ह्मणतां येईल सुताच्या चार वार कपड्याच्या तुकड्याबदला लोकरीचा दोन वाराचा तुकडा मिळेल. लोकरीच्या दोन वाराच्या तुकड्याऐवजी रेशमाचा एक वारा, तुकडा मिळेल. ऋणजे अशा त-हेने एखाद्या वस्तूचे मूल्य तिच्याशी ज्यांची ज्यांची तुलना करितां येईल इतक्या निरनिरळ्या वस्तूमध्ये सांगता येईल; परंतु मूल्याची कल्पना ठरविण्याकरितां एकद एखाद्या पदार्थाचा संकेत केला की, त्या पदार्थांचे मूल्य सांगता