पान:रुपया.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३६ )

 पैशामध्ये विनिमयसुलभता, सर्वग्राहाता व मूल्याचे सर्वसाधा रण परिमाण हे गुण मुख्यतः असावे लागतात.शिवाय पैसा हा मूल्याचा सांठा, मूल्याचं मापन, विलंबित देवघेवीचें साधन व पतीच्या व्यवहारास साधनीभूतनिधि अशा प्रकारची कार्ये करितो. लेव्हां आतां या त्याच्या कार्यभागाचा त्रोटकपणे विचार करूया.
 १ पैशाचं मुख्य कार्य में विनिमयसुलभता, ते फार महत्वाचे आहे. कारण ऐनजिनसी व्यवहारांत फार अडचणी असतात हे वर सांगितलेच आहे पण आपण समाजाच्य प्राथमिक अवस्थेतील मनुष्याचे एक उदाहरण घेऊं ह्मणजे ही गोष्ट जास्त स्पष्ट होईल. समजा की, एका मनुष्यापाशी फक्त एक भाला आहे. त्यावर शिकार करून तो आपला उदरनिर्वाह करतो व दुसया एका मनुष्यापाशी फक्त एक जाळे आहे, त्यायोगे मासे धरून तो आपला उदरनिर्वाह करतो. आतां भालेवाल्या मनु- प्याची इच्छा आहे की, आपणांस जाळें हवें व त्याच्या मोब- दला आपल्या जवळची एकच एक वस्तु जी भाला, ती तो देण्यास तयार आहे; परंतु जाळेवाल्या मनुष्याच्या मनांत भाला आपणांस पाहिजे अशी प्रबल इच्छा झाली तरच हा सौदा जमा- वयाचा. बरें, दुसरा एक प्रश्न असा की, एका जाळयास एक भाला ही अदलाबदल बरोबर होईल कां जाळेवाल्यास भाले- वाल्याने भाल्याखेरीज आणखी एखादी वस्तु त्यास पाहिजे अशी द्यावी लागेल ? जगांतील सर्वच वस्तु सारख्या प्रमाणांतील श्रमां-