पान:रुपया.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



(८)

प्रमाण झाल्यास १५ काटि रुपये लागतील. अशा स्थितीत मार्चमध्ये अंदाजपत्रकांत आपण १८ कोटींचा हिशोब केला व हुंडणावळ पुन्हां १:१५ झाली तर ३ कोटि शिल्लक राहील, व १:२५ झाल्यास ७ कोटींची तूट येईल. सप्टेंबरमध्ये ही तूट येईल असे कळल्यास एकदम ७ कोटी रुपये करांच्या योगाने उत्पन्न कर अशक्य आहे. कारण एकदां कर ठरविल्यावर पुन्हां ते एक वर्ष पर्यंत बदलता येत नाहीत.

 आतां, कल्पनिक उदाहरण सोडून एकदोन सालची वस्तु स्थिति आपण पाहू. १८७३ साली होम चार्जेसची संख्या १३ दशलक्ष म्हणजे १ कोटी ३० लक्ष पौंड होती व त्यावेळच्या हुई शावळीचो दर १ रुपया १ शि० १0.१/२ पेन्स असा हातात्यामुळे होम चार्जेसकारितां अदमासे १४ कोटि रुपये द्यावे लागले. १८९२ सालीं दर १ रु = १ शि० ३ पेन्स असा होता व होम चार्जेसचा आंकडा १ कोटि ६५ लक्ष पौंड होता. त्यावेळेस अदमासे २६.१/२ कोटि रूपये द्यावे लागले; फक्त ३५लक्ष पौंडाचा फरक असतांना रुपयांच्या संख्येत १२.१/२ कोटींचे अंतर पड: ही फुगलेली रक्कम फक्त रुप्याच्या स्वस्तपणामुळे हिंदुस्थानात द्यावी लागली. १८७२ सालच्या हुंडणावळीप्रमाणे हीच रक्कम १७ कोटि ५० लक्ष रुपये झाली असती. अशा रीतीने कराच मान शुक्लदूप्रमाणे वृद्धिंगत होत चाललें. अशा अनेक आपत्तीमुळे रुप्याच्या अवनतीचा प्रश्न सोडविणे अपरिहार्य झालें,