पान:रुपया.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३५ )

मवहाराच्या पद्धतीमुळे आपणांस कशा अडचणी आल्या याचद्दल धाडशी प्रवाशी लोकांनी मोठी गमतीची वर्णने दिली आहेत.]
 आतां यानंतर समाजाची दुसरी स्थिति गोपवृत्तीची.समा- जाच्या या अवस्थेत गुराढोरांचा उपयोग पैशाप्रमाणे करीत असत, अशा प्रकारचे अनेक उल्लेख होमरच्या इलियडसारख्या प्राचीन ग्रीक काव्यांत किंवा आपल्याकडील महाभारतादि ग्रंथांत जागो- जाग आढळतात. परंतु जसजशी समाजाची औद्योगिक व इतर बाढ होऊं लागली व समाज सुधारत चालला, तसतसा वर वर्णि- लेल्या प्रकारच्या अनेक विनिमयसामान्यांचा किंवा पैशाचा लोप होत जाऊन, त्या जागी धातूंचा उपयोग होऊं लागला. तांबें, कथील, रुपैं, सोनें वगैरे धातु पैसा ह्मणून उपयोगांत येऊ लागली. शरीर भूषविण्याकरितां अलंकार ह्मणून अथवा इतर प्रकारेंही धातू या वेळी समाजांत वापरण्यांत येत होत्या. अर्थात् निरनिरळ्या चातूंमधील फरक, गुणाचगुण व त्यांची श्रेष्ठता ही लोकांच्या लक्षात आली होती. आतां एक वेळ धातूंचा पैसा ह्मणून उप- योग होऊं लागल्यावर त्यांच्या नैसर्गिक श्रेष्ठतेच्या अनुक्रमानेंच त्यांची व्यवहारांत पैसा ह्मणून कमी अधिक योग्यता ठरावी हैं साहजिकच आहे. आतां पैशाचा कार्यभाग कोणता व उत्तम पैसा ठरण्याकरितां त्यामध्ये कोणते गुण अवश्य लागतात ते पाहू. आणि अशा तऱ्हेनें उत्क्रांत झालेल्या पैशाच्या योगानें समा- जांत कोणत्या तऱ्हेची कार्ये होतात याचा विचार करूं.