पान:रुपया.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १३४ )

होता त्यावेळची स्थिति फार निराळी होती. शिकार करून त्या- वर निर्वाह करणे हेच त्या वेळचें जीवितध्येय होतें. अर्थात् त्या स्थितीत मनुष्याच्या गरजाही फार कमी होत्या आणि त्याची संपत्ति लणजे शिकार, कातर्डी, हार्डे व पिसें अशा प्रकारची होती. अशा वेळी एकमेकाच्या गरजा भागविण्याचे जे प्रसंग येत असत किंवा जो कांहीं थोडाबहुत व्यवहार चालत असे तो सर्व ऐन- जिनसी अदलाबदलीवरच. परंतु समाजाची जसजशी वाढ व प्रगति होऊं लागली, तसतसे ऐनजिनसी व्यवहारास कठीण पडूं लागलं. ऐनजिनसी व्यवहारामध्ये मोठा दोष हा की, सौदा जुळणे कठीण पडते. कारण एखाद्यास जी वस्तु पाहिजे असते, ती वस्तु जवळ असणारा मनुष्य पहावा लागतो व पहिल्या इसमाजवळ असणाचा वस्तूची गरज दुसऱ्या मनुष्यास असावी लागते तेव्हां कोठें सौदा जमतो. या व अशा तऱ्हेच्या ऐनजिनसी व्यवहारांतील दुसऱ्या अडचणी नाहींशा करण्याकरितां कांही तरी एक विनिमयसामान्य ( वस्तु ) ह्मणूनच पैसा हा अस्तित्वांत आला. निरनिराळ्या देशांत समाजाच्या निरनिराळ्या अवस्था अनेक प्रकारचे पदार्थ विनिमयसामान्य किंवा पैसा ह्मणून उपयोगांत आले आहेत असे इतिहासाकडे पाहिले असतां आपणांस आढळून येते.कात- ड्याचे तुकडे, हाडें, कवड्या, शिंपले, पिसें, चहा, तांदूळ, तंबाकू व मीठ अशा प्रकारें ही यादी किती तरी लांबविता येईल. [ अगदी आजदेखील रानटी लोकांत ऐनजिनसी