पान:रुपया.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण ७ दें. पैसा व त्याचे कार्य आणि चलनाची तत्३. --- --- - श्रमविभागाचे तत्व हे समाजाचा मूळ पाया आहे असे में प्लेटोने झटले आहे ते बरोबर आहे. झारण हल्लीच्या सुधारलेल्या समाजांत मुद्धां प्रत्येक मनुष्यास त्यास प्रत्यहीं अवश्य लागणा-या अन्नवस्त्रादिकांपासून तो मोटारीसारख्या चैनीच्या पदार्थापर्यंत प्रत्येक वस्तु श्रमविभागाच्याच तत्वावर उत्पन्न होत असते आणि अश। प्रकारची प्रत्येक वस्तु तयार होत असतांना तिच्या अगदी प्रारंभपासून तो ती वस्तु पूर्ण तयार होऊन उपयोगांत येईपर्यंत तिचं जी अनेक रूपांतरें व · स्थित्यंतरे होत असतात, तिचे प्रत्येक लहानसहान रूपांतर व स्थित्यंतर अनेक मनुष्यांचे कौशल्य छ । श्रम यांचे सहाय्यानेच होत असते. झणजे हल्लीच्या समाजांतील मनुष्यास त्याच्या साध्या गरजादेखील त्याच्या त्यास स्वनिर्मित वस्तूवर भागविणे अशक्य आहे; परंतु मानवी समाजाच्या त गरजा मात्र मनुष्यजातीच्या परस्पर सहाय्यानें भागवितां येतात. यावरून असे स्पष्ट होते की, प्रत्येकांतील विशिष्ट गुण, कौशल्य - व श्रम यांच्या अदलाबदलीवरच सर्व समाज सुखाने व सुरळीतपणे व्यवहार करू शकतो. ही स्थिति सुधारलेल्या समजा झाली; परंतु फार प्राचीन काळीं मनुष्य हा जेव्हां रानटी स्थित