पान:रुपया.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( १३२ )

 या सर्व आक्षेपांविषयी विस्तृत विचार करणे या लहानशा पुस्तकांत शक्य नाहीं, तथापि यांपैकी बहुतेक आक्षेप खरे आहेत असे ह्मणण्यास पुष्कळ आधार आहे. महायुद्धाच वेळेस या कृत्रिम पद्धतीमुळे अनेक संकटें उत्पन्न झाली. कारण नसतांना येथे १०० कोटि रुपयांच्यावर रुपये पडावे लागले. सुवर्णचलन असते तर रुपये न पाडतां, नुसत्या जमाखर्चत हिशोब करून हिंदुस्थानांतून जो माल इंग्लंडांत पाठविला त्याची विल्हेवाट लागली असती. हिंदुस्थान व इंग्लंड दोनही देशांत एकच चलन असल्याने, नियोत माल जास्त झाला तरीही येथे केन्सिलबले पटवून जास्त रुपये पाडण्याचा प्रसंग येणार नाही.
 या पद्धतीप्रमाणे रुपयाची किंमत १६ पेन्स ठरविणे हाच काय तो निःश्रेयसाचा मार्ग समजला जातो. इतर कोणतीही कारणे या बाबतींमध्ये रद्द ठरविली जातात. एक्सचेंज बँका, सोन्यारुप्याचे व्यापारी, आयात व निर्यात मालाची घडामोड करणारे व्यापारी हे या पद्धतीचा फायदा करून घेतात व त्यामुळे सोन्याच्या चलनाचा प्रश्न आला ह्मणजे हे सर्व लोक हल्लींच्या पद्धतीचा पुरस्कार करून सुधारणा करू देत नाहीत. गोखले, थाकरसी, वेव, वाच्छा यांना हिंदुस्थानचे हित जास्त समजतें किंवा या व्यापा-यांस जास्त समजते हा एक मनोरंजक प्रश्न आहे.