पान:रुपया.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १३१ } गोखले यांनी १।२ कोटीपेक्षा जास्त शिल्लक अंदाजपत्रकांत असणे हैं अयोग्य आहे असे कौन्सिलच्या निदर्शनास अनेक वेळां आपल होते व हा मुद्दा लॉर्ड कर्झन यांनीही कबूल केला होता. | ( ४ ) नोटांचा निधि सिक्यूरिटीच्या रूपांत इंग्लंडांत असणे ॐ अर्थशास्त्राच्या तत्वांच्या अगदी विरुद्ध आहे. कोणत्याही देशांत, नोटांचा निधि रोख न ठेवतां कागदी रोख्यांच्या स्वरूपांत व तोही दूरच्या एखाद्या स्थानी ठेवण्याची पद्धति नाहीं. । नोटांचा सर्व निधि हिंदुस्थानांत असला पाहिजे व तोही ३ रोख रूपये अथवा पौंड या स्वरूपांत असला पाहिजे. । (५) सुवर्णचलनीनधाचा मूळ उद्देश सोन्याचे नाणे करणे हा फीलर कमिटीप्रमाणे असतांना ते सर्व फेटाळून लावून हा निधि फक्त हुंडणावळ स्थिर राखण्याकरितां ठेवलेला आहे. । सोन्याचे चलन केल्यास, हुंडणावळीची भानगडच नाहीशी होईल, अशा कृत्रिम पद्धतीने हिंदुस्थानांत कृत्रिम किंमत दिलेले रुपये राहून हिंदुस्थानचे नुकसान होते. ते असे. रुपये १६ पेन्साच्या किंमतीचे झाल्यामुळे येथील इंग्लिश व्यापा-यांस इंग्लंडांत फायदेशीर दराने रुपये पाठवितां येतात; परंतु येथील व्यापा-यांना निर्यात मालाबद्दल फक्त रुपयेच मिळतात. हेच रुपयांऐवजी पौंड मिळाल्यास जास्त फायदा होईल. सोन्याचे नाणे केल्यास निर्यात मालापासून जास्त फायदा होईल.