पान:रुपया.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १ ३ ० )

 ( १ ) या निधींच्यामुळे स्टेट सेक्रेटरीच्या हातांत अतिशय मोठी रक्कम जमा होते. त्याचे सल्लागार हे बहुतेक लंडन येथील बैंकर व व्यापारीवर्ग यांमधून घेतलेले असल्याने, लंडनच्या हिताहिताकडे नैसर्गिक रीतीने त्यांचे लक्ष जास्त जाते व हिंदुस्थानच्या दृष्टीने प्रत्येक गोष्टीचा शक्य तेवढा विचार त्यांच्याकडून होत नाहीं.
 ह्या रकमा पुष्कळ वेळां शेंकडा २ व्याजाने कर्जाऊ देतात. त्याच वेळी हिंदुस्थानांत व्याजाचे दर ६।७ असूनही येथे पैसे मिळत नाहींत. उदाहरणार्थ, १९१२ साली निधींशिवाय स्टेट सेक्रेटरीजवळ २७ कोटि रुपये रोखशिलकेंत होती. इतक शिल्लक ठेवणे हे अयोग्य आहे.
 (२) निधींची मर्यादा ४० कोटि सरकारने ठरविली असूनही हल्ली त्याच्या दुप्पट रकम निधीत आहे; तथापि ती रक्कम हिंदुस्थानांतील शिक्षण, आरोग्य इत्यादि अत्यावश्यक बाबींकडे न लावितां, इंग्लंडमध्येच जमा होत चालली आहे. पई इचे करणार काय याबद्दलही स्टेट सेक्रेटरीकडून कांहीं धोरण जाहीर केले जात नाही. या रकमा हिंदुस्थानांतच असल्या पाहिजेत. फक्त हुंडणावळ स्थिर राखण्याकरिता लागणारी रक्कम तेथे असावी.
 ( ३ ) शिल्लक पुष्कळ जमते याचा अर्थ करांच्या रूपाने जास्त पैसे वसूल होतात. असे होणे अनिष्ट आहे. नामदार