पान:रुपया.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १२९ )

रितां नोटांच्या निधीपैकी ३।४ कोटि रुपयांचा उपयोग करावा हेच उत्तम आहे. नोटा दिल्याशिवाय रपये देण्याकरिता एक कायदा पास करून घ्यावा लागेल; परंतु असे करणे अवघड नाही. त्याचप्रमाणे खजिन्यांत जी शिल्लक आहे ती शक्य तितकी नोटांच्या रूपांत ठेवून रुपये सर्व नोटांच्या निधीत ठेवावे.
 इंग्लंडमधील शिल्लक दोन स्वरूपांत असते. रोजच्या व्यवहारापुरती रक्कम बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेविलेली असते. दुसरा हिस्सा उत्तम पतीच्या बँकांस. हुंड्यांच्या व्यापा-यांस व शेअरच्या दलालांस कर्जाऊ देतात. ह्या व्यापा-यांची दरसाल यादी करतात व त्या यादीस 'पसंत केलल कर्जदार यांची यादी' असे ह्मणतात. अशा रकमेपासून बरेच व्याज जमा होते. ह्या रकमा दोन किंवा तीन महिन्यांपेक्षा जास्त मुदतीने देत नाहीत.
 - १९१२ मध्ये या दुस-या रकभासंबंधाने बरीच टीका इंग्लंडांत व हिंदुस्थानांत झाला. टीकाकारांचे ह्मणणे असे होते की, ध्याजाने रक्कम द्यावयास सांपडते याचा अर्थ असा होता की, त्या रकमेची स्टेट सेक्रेटरी यांस जरूर नाहीं. एक तर ही रक्कम हिंदुस्थानांतून नेऊ नये किंवा तिचा पूर्वीचे कर्ज वारण्याकडे विनियोग करावा.
 या निधींच्या रचनेसंबंधाने व त्यांच्या विभागणीसंबंधाने पुढीलप्रमाणे आक्षेप येथील कन्सिलचे सभासद, अर्थशास्त्रज्ञ व वर्तमानपत्रकार यांनी घेतलेले आहेत.