पान:रुपया.pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




(७)

लागले. तथापि धान्य व आयात माल ही महाग होणे हे नुकसान कांहीं लहानसहान नव्हते.

 हिंदुस्थान सरकारास ( ह्मणजे पर्यायाने हिंदुस्थान देशास ) इंग्लंडमध्यें पौंडामध्ये जे देणे द्यावे लागते त्याला ‘होम चार्जेस' असें म्हणतात. ही रक्कम रेलवे कालवे वगैरेकरितां काढलेले जे कर्ज आहे त्याचे व्याज, सिव्हिलिअन लोकांची पेन्शने व रजेतील पगार, रेलवेकरितां स्टेअर्स' म्हणजे वस्तु इत्यादिकांची बेरीज करून झालेली असते. आतां रुपे स्वस्त झाल्यामुळे व हुंडणावळ अनिश्चित झाल्यामुळे ही रक्कम पौंडांत देण्यास किती रुपये एकत्र करावे लागतील हे ठरवितां येईना; पूर्वीपेक्षा जास्त रुपये द्यावे लागतात एवढे मात्र निश्चित होते. कोणत्याही देशांतील जमाखर्चाच्या खड्याचे आद्यतत्व असे आहे की, एखादी बाबत कमी खर्चाची असो अथवा जास्त खर्चाची असा, एखादी जमा जास्त असो वा कमी असो, परंतु तो आंकडा ठोकळ मानाने तरी निश्चित असला पाहिजे, नाहीतर अंदाज करणे अशक्य होईल, जो अंदाज दहा बीस कोटींनी जास्त कमी होऊ शकतो तो अंदाज कसलाई

 हे दाखविण्याकरितां, आपण एक काल्पनिक उदाहरण घेऊ. कल्पना करा की, होम चार्जेस १ कोटि पौंड आहेत. पौंडाचे रुपयाशीं प्रमाण १:१० असल्यास आपणांस हिंदुस्थानांत १० कोटि रुपये एकत्र करावे लागतील. आतां, हे प्रमाण १:१८ झाल्यास १८ कोटि रुपये एकत्र करावे लागतील. १:१५ असे