पान:रुपया.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ११९ ]

 नोटांच्या निधींत सोनें किती असावें व पौंडांच्या सिक्यूरिटी किती असाव्या याविषयींसुद्धां मतभेद आहे.महायुद्धाच्या अडचणीमुळे या निर्ध पैकी ९८ कोटींचा भाग ट्रेझरी बिलूस च इतर पौंडांच्या सिक्यूरिटी या स्वरूपांत ठेवण्याविषयीं विशिष्ट कायदा केलेला आहे; परंतु महायुद्धाच्या पूर्वी फक्त ४ कोट रुपये पौंडांच्या सिक्यूरिटींत ठेवण्याची परवानगी असे. याशिवाय नोटांचा निधि हा रुपयांत किंवा पौंडांत ठेवण्याचा विकल्प अस- ल्यामुळे, या निश्रींत १९०० सालाप सून इंग्लंडमध्ये सोनें ठेवू लागलें, हें पूर्वी (प्रकरण ३ यांत ) सांगितलेच आहे. १९०३ पासून १९१३ पर्यंत दहा वर्षांत या निर्धीत सरासरीनें दरसाल १५ कोटि रुपयांचें सोनें ( अथवा पौंड) असे. हिंदुस्थानांतील आक्षेपकांचें असें ह्मणणें आहे की, ४ कोटींच्या पौंडांच्या सिक्यू- रिटीशिवाय बाको सर्व नोटांचा निधि हिंदुस्थानांत असावा. हल्ली इंपीरियल बँक स्थापल्यामुळे हे त्यांचें तत्व अमलांत आणण्यास कोणतीही हरकत दिसत नाहीं. वास्तविक नोटांचा निधि इंग्लं- डांत असणें अगदींच व्यवहारास सोडून आहे. नोटा पटविण्या करितां जो निधि आहे, तो येथेच असला पाहिजे.१९१३ पासून पुढें या निधीत जास्त सोनें ठेवूं लागले.नोटांची संख्या जशी वाढूं लागली, तसतसा एकंदर निधि वाढू लागला व त्य प्रमाणानें निर्धीतील सोनेंही वाहूं लागले.महायुद्धाचे सुरवातीन है सोनें कमी करून याच्या ऐवजी ३४ कोटीपर्यंत पौंडांच्या