पान:रुपया.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ११८ ]

 प्रो० कोन्स यांच्या मतें* '१६ कोटि पौंडांच्या सिक्यूरिटींत ठेवावे व बाकींचे हिंदुस्थानांत किंवा इंग्लंडमध्ये सोन्याचें नाणं किंवा सोनें या स्वरूपांत ठेवावे. नोटांच्या निधीतील ६ कोटींचं सोने काढून टाकून ते सुवर्णचलननिधींत ठेवावें व सुवर्णचलन- निधींतील ६ कोटि रुपये नोटांच्या निर्धीत ठेवावे. असे केल्याने सुवर्णचलननिवत फक्त सोनें राहील व त्याचें स्वरूप मिश्र न होतां एकाच जातीचें होईल. ' ही सूचना विचार करण्यासारखी आहे.
 हल्लीं सुवर्णचलननिधींत ६ कोटींचे रुपये असतात. त्यामुळे दोनही निधींत रुपये व पौंड झाल्यामुळे घोंटाळा होतो. या करितां सुवर्णचलननिधि हा पौंडांच्या सिक्यूरिटी किंवा सोने या स्वरूपांत असल्यानें, हिशोबांत जास्त व्यवस्थितपणा येईल.
 १९२० नोव्हेंबरमध्ये सुवर्णचलननिधि येणेप्रमाणे होता.

पौंड.

 सोने हिंदुस्थानांत

 रोख शिल्लक इंग्लंडांत

२१७.

 सिक्युरिटी सप्टेंबरपर्यंल

१८.६१०,४७७.

 सिक्युरिटी नवीन घेतलेल्या

१९,२२५, २१२.


३७,८३५,९०६

.


*Keyor's Indian Currency and Finance, pp. 173-174.