पान:रुपया.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ११७ ]

इंग्लंडांत १० कोटि रुपयांचे अधिक सोने असलेले फायदेशीर होईल. ह्या सोन्याच्या आधारावर सरकारी उलट हुंड्यांशिवाय एक्सचेंज बँकांना पौंडाचे ड्रेफ्ट देतां येतील किंवा हे पौंड हिंदु- स्थानांत पाठवून रुपये घेतां येतील. हे १० कोटि मिळविले असतां सोन्याच्या निधींची कमाल मर्यादा ७० कोटि होईल. यापेक्षां अधिक ठेवण्याची आवश्यकता नाहीं.
 आतांपर्यंत एकंदर निधीविषयीं विवेचन झाले. परंतु यापैकी कोणता भाग सुवर्णचलन निधींत असावा व कोणता भाग नोटांच्या निधींत असावा यासंबंधानें पुष्कळ मतभेद असल्यामुळे याविषयी तपशीलवार विवेचन केले पाहिजे. लॉर्ड कर्झन यांचे वेळीं सुवर्ण- चलन निधींत १५ कोटि रुपये असावे असे सरकारी अर्थशारू- ज्ञांचे मत होते. नंतर १९१२/१३ च्या सुमारास हा निधि ४० कोटींचा असावा असे अधिकाऱ्यांचे मत होतें. चेंबरलेन कमिशनच्या मतानें ४० कोटि ही मर्यादा अपुरी असून यापेक्षां जास्त सोनें या निधीत असावें. १९९९ मध्ये हा निधि जवळ जवळ ५५ कोटींचा होता. इतकें असूनही नवीन रुपये पाडण्या- पासून जो नफा होतो, तो अद्यापि या निर्धीत घालण्याचा क्रम चालू आहे. हिंदुस्थानांतील अर्थशास्त्रज्ञांच्या मतें हैं धोरण चुकीचे आहे. त्यांच्या मते हा निधि आतां बंद करून ठेवावा च रुपये पाडून होणारा फायदा नेहमींच्या जमाखर्चीत घालून त्याचा खर्चाकडे विनियोग करावा.