पान:रुपया.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ११६ ]

 गेल्या पंधरा वर्षांत सामान्यतः आयात मालापेक्षां निर्यात मालाचे आधिक्य ६० कोटींचे होते. दुष्काळाच्या साली हा फरक ३० कोटींपर्यंतच असतो. दुष्काळाच्या साली, होम चार्जेस अदमास ३० कोटि व नवीन कर्ज अदमास १० कोटि यानमा | दुसऱ्या बाजूला घातले ह्मणजे दोनही बाजूंचं तोंड मिळाले. परंतु आयात व निर्यात यांमधील फरक २१ कोटिच असल्यास व ३० कोटि रुपयचं कर्ज पाहिजे तेव्हां थोडक्या व्याजाने न मिळाल्यास एवढी तूट येईल व ही तूट निधींमधून भरून काढावी लागेल. नवीन कर्ज किती काढावे लागतें हैं एकंदर तांडमिळवणीवर अव- लंबून असतं. तांडमिळवणी न झाल्यास नवीन कर्ज इंग्लंडांत काढतात. १९०९ मध्ये ७ कोटींचे कर्ज काढावें लागले; परंतु १९१० मध्ये निर्यात पुष्कळ असल्यामुळे ५ कोटीचेंच कर्ज काढाले १९१९ मध्ये निर्यात माल आयात मालापेक्षां ८२, कोटीनी जास्त असल्यामुळे फक्त ६०,००० रुपयांचेंच अर्ज काढले. एकंदर सरासरी काढली असतां, कितीही वाईट साल असले तरी १० कोटीपेक्षा अधिक कर्ज काढावे लागेल असे वाटत नाही.
 वरील विवेचनावरून पुढील अनुमाने निघतात. नोटा किंवा रुपये घेऊन पौंड देण्यास ६० कोटि पुरे आहेत. कारण ३०/४० कोटींचा उलट हुंड्या व १० कोटि रुपये नवीन कर्ज हे सर्व त्यांत भागते. याशिवाय बँकांना मदत देण्याची वेळ आल्यास