पान:रुपया.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( ६ )

काढलेल्या कर्जावर काय झाला हे आतां पाहिले पाहिजे. हिंदुस्थानचा पुष्कळसा व्यापार सोन्याचे नाणे हे चलन असणाऱ्या देशांशी आहे. त्यामुळे त्या देशांत एका पौडास जो माल मिळत होता त्याची किंमत येथे १० रुपये ठेविली म्हणजे कार्यभाग होत असे. आतां त्याच मालाची किंमत १५ किंवा २० ठेवणे आवश्यक झालें; नाहीतर खर्च केलेला पौंड वसूल होणे शक्य नव्हते. अशा रीतीने आवश्यक अशा आयात मालाची किंमत दिवसेंदिवस वाढू लागली. जो चाकू ६ आण्यास मिळत असे त्याची किंमत १२ आणे झाली. जी बायसिकल ९० रुपयांस मिळत असे तिची किंमत १७५-२०० पर्यंत झाली. याच्या उलट निर्यात मालाची किंमत खस्त झाली. परंतु या स्वस्ताईमुळेच, बाहेरच्या व्यापाऱ्यास येथे चहा, कापूस, गहू, पोतीं, गळिताची धान्ये वगैरे माल घेणे फायदेशीर झाले. त्यामुळे ह्या व्यापारास तेजी येऊन अधिकाधिक माल बाहेर जाऊ लागला. त्यामुळे देशांत, धान्य पिकविण्याची प्रवृत्ति कमी होऊन वर लिहिलेल्या व्यापारी मालाच्या उत्पादनाकडे जास्त लक्ष्य गेले. यामुळे दिवसेंदिवस धान्य महाग होत चालले. देशांतील एकंदर किंमती विशेष बदलल्या नाहीत; कारण रुपया हेच नाणे येथे प्रचलित असल्यामुळे सोन्याशी रूपयाचे प्रमाण जरी बदलले तरी त्याचा या देशांतील किंमतीवर काहीं परिणाम झाला नाही. फक्त सोने ही वस्तु रुपयांच्या तुलनेने महाग झाली म्हणजे तेाळाभर सोन्यास जास्त रुपये पडू