पान:रुपया.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[११५]

नाही. या कल्पनेवरच सध्यां निधींच्या आकाराचे प्रमाण बस- बिले पाहिजे. १९८७७८ मध्ये आंतरराष्ट्रीय देणे जास्त झाले, परंतु बँकांची हिंदुस्थानांत विशेष त्रेधा झाली नव्हती.त्यामुळे उलटहुंड्या विकून पौंड दिल्याबरोबर सर्वत्र शांतता झाली; परंतु नेहमी अच होईल असे मानतां येत नाही. विशेषतः नोटांची लोकप्रियता ही अगदी आधुनिक असल्यामुळे, नोटांविषयीं अवि- श्वास होऊन, नोटा व रुपये जमविण्याची हूल केव्हां उडेल याचा नियम नाहीं. अशा स्थितीत रुपयांचा निधि व पौंडांचा निश्रि हे दोनही भरभक्कम असल्याशिवाय अशा संकटास पाठ देतां येणार नाहीं. बँकांवरील विश्वास उडाला तरी लोकांनी नोटा वेण्याचे कबूल केल्यास पुष्कळ काम होईल. कारण नोटा व्यव हारांत राहिल्यास, रुपये व पौंड यांवर विशेष भार पडणार नाहीं : पण याप्रमाणे होईलच असे खालीने सांगता येत नाही.
 अशा तऱ्हेने सरकारची जबाबदारी ही फक्त रुपयांच्याऐवजी पौंड देण्याची नसून, व्यापाराच्या देवघेवींत चलबिचल झाली असतां जी आपत्ति येईल, तिचा प्रतिकार करण्याचीसुद्धा आहे असे मानले तर ६० कोटि रुपयांचा सोन्याचा निधि बस्स होईल किंवा नाही ? हा प्रश्न सोडविण्यास व्यापाराच्या आंकड्यांचा व हिंदुस्थानास नवीन कर्ज दरसाल किती काढावे लागते याच्या आंकड्यांचा तपशील पाहिला पाहिजे.