पान:रुपया.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ११४ ]

रियल बँकेचा व एकंदर बँकिंगचा निकट संबंध येऊन ते आप- सांत कोणतेही धोरण ठरवितील. अशा संकटांत इंपीरियल बँकने आपल्या जवळचे रुपये, पौंड व सोनें हं इतर बँकांस शक्य तेवढे देण्याचा प्रयत्न करावा. वाटले तर या कर्जाबद्दल व्याजाचा दर ८।१० टक्के ध्यावा; परंतु जवळ शिल्लक असतां देशांतील बँकांचे दिवाळें वाजण्याचा प्रसंग येऊं देणें हें कधींही हितावह होणार नाहीं.
 इंग्लंडांत अशा आणीबाणीच्या प्रसंगी बँक ऑफ इंग्लंड आ पली शिल्लक इतर बँकांस शक्य तितक्या प्रमाणांत देण्याचे वचन देते व त्यामुळे पुष्कळ वेळां अनिष्ट प्रसंग टळून सर्व स्थिरस्थावर होतें. तेंच काम येथें इंपीरियल बँकने केलें पाहिजे. सर्वांत महत्वाचा मुद्दा असा आहे कीं, थोडको थोडकी रक्कम प्रत्येक आठवड्यांत देण्यापेक्षां, मोठी रकम एकदम देऊं करणें हें जास्त परिणामकारक असतें. त्ययोगानें वेळीच लोकांची भीति कमी होऊन, पुढे येणारें संकट पुष्कळ वेळां टळतें. उलट असे न करितां तटस्थ राहिल्यास, बँकांची स्थिति अधिक अधिक अस्थिर होऊन, त्यांची शिल्लक कमी होते व नंतर पहिल्या रकमेच्या चौपट रक्कम देऊनही कार्य होत नाहीं.
 हिंदुस्थानांतील बँका अगदी नवीन असल्यामुळे व त्यांपैकी पुष्कळ आपल्या व्यवहारांत अवापि वाकत्र झाल्या नसल्याकार- णानें, बँकांचें दिवाळें वाजण्याचा संभव केव्हां येईल याचा नियम