पान:रुपया.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ११३ ]

काही लोकांची कल्पना अशी आहे की, एखादे वेळी दोन तीन दुष्काळाची वर्षे एकामागून एक आल्यास ६० कोटींचा निधि पुरा- बयाचा नाही; परंतु गेल्या पन्नास वर्षांच्या अनुभवाने असे होणे हे अशक्यप्राय असल्यामुळे त्याविषयी विचार करण्याचे कारण नाहीं.
 आतां दुष्काळामुळे आलेले संकट व देशांतील बँकांची त्रेधा अशी दोनही एकवटल्यास, निधींची स्थिति काय होईल ? अशा वेळीं प्रत्येक जण रुपये किंवा नोटा बँकांतून काढून आपल्या घरी ठेवील, त्यामुळे उलटहुंड्या विकत घेण्यास लागणाऱ्या नोटा व रुपये बँकांजवळ राहणार नाहीत. व्याजाचा दर भडकून जाईल व बँकांना उलटहुंड्या रोख पैसे न घेतां दुसऱ्या कांहीं तारणावर सरकारास देणे भाग पडेल. वास्तविक पहातां, सरकारने मदत करणें हें देशाच्या हिताच्या दृष्टीने बरोबर होईल; परंतु प्रत्येक संकटांत सरकार आपल्यास मदत करील अशी बँकांची खात्री झाल्यास, त्यांची स्वतःच्या जबाबदारीची जाणीव दुर्बल होईल व ते हल्लीपेक्षाही कमी शिल्लक ठेवूं लागतील.
 या सर्व अडचणी टाळण्यास एकच उपाय आहे. तो हा की, इंपीरियल बँकेच्या हातांत सरकारी सर्व शिल्लक देऊन, संकट- काली तिचा उपयोग कसा करावा हे सर्वस्वी तिच्या चालकांच्या हातांत ठेवावें. असे केल्याने सरकार जसे आजपर्यंत बँकिंगच्या व्यवहाराच्या बाहेर राहून तटस्थ राहत असे, तसे न होता,इंपी-