पान:रुपया.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १११ ]

युद्धाच्या सुरुवातीस रुपयांचे एकंदर चलन २०० कोटि रुपयांचें होते असे मानण्यास हरकत नाहीं. यांमध्ये ५० कोटींच्या नोटा मिळविल्या ह्मणजे एकंदर चलन २५० कोटि झालें.
 संकटकाळी यांपैकी किती रक्कम चलनांतून काढणे परवडेल ह्याचें अनुमान केले पाहिजे. १९०८ च्या आणीबाणीच्या प्रसंगी जवळ जवळ ४० कोटि रुपये कमी झाले व तितकेच पौंड इंग्लंडांत द्यावे लागले हें वर दिलेच आहे. याहीपेक्षां कठिण प्रसंग येणे सध्यांच्या काळीं शक्य दिसत नाहीं. तथापि याही पेक्षां कठिण असा परीक्षेचा काळ आल्यास, यापेक्षां १५ अथवा कमाल ह्मणजे १० कोटि रुपये जास्त काढावे लागतील.हे अनुमान बरोबर असल्यास, एकंदर सोन्याचा निधि ६० कोटि रुपयांच्या किंमतीचा असला ह्मणजे त्यापेक्षा अधिक वाढविणें है अपव्यय करण्यासारखें होईल. सिक्यूरिटीबद्दल जरी व्याज येते तरी रोख पौंड व सोनें असतें तें बिनव्याजी अडकून पडलेले असते. यामुळे कमाल मर्यादेच्या बाहेर निधि ठेवणें हें हानि- कारक आहे.
 आतां दुसया उपपत्तीप्रमाणे निर्धीच्या कर्तव्याची व्याख्या केली असतां कमाल मर्यादा काय उरते ते पाहूं. एक प्रसंग अशा तम्हेचा आहे की, हिंदुस्थानांतील बँकांनी शिल्लक कमी ठेविल्यामुळे अथवा सट्टे राजी केल्यामुळे त्यांना आपल्या ठेवी परत देतां येणे शक्य नाही. नवीन कंपन्या काढणे, आयात