पान:रुपया.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ ११० ]

जेत. दुसऱ्या पक्षाच ह्मणणें असें आहे की, वर लिहिलेला फक्त एक उद्देश आहे व तोही गौण आहे. सोन्याच्या निधींचा मुख्य उद्देश असा आहे कीं, निर्यातमालापेक्षा आयातमाल जास्त झाल्यामुळे किंवा दुसऱ्या कोणत्याही कारणामुळे (उदाहरणार्थ, येथील बँकाचें दिवाळें वाजण्याची वेळ आल्यास ) आह्मांला जे आंतरराष्ट्रीय देणें संकटकाळीं द्यावें लागेल, तें सर्वं देणें सोन्यांत देतां यावें. या दोन उद्देशापैकी दुसऱ्याा उद्देशाच्या अनुरोधानें हल्लींचें सर- कारचें धोरण बहुतकरून ठरवितात.
 पहिल्या उपपत्तीप्रमाणें निधि विशेष मोठा असण्याची जरूर नाहीं. आंतरराष्ट्रीय देणें असल्यास त्याबद्दल तरतूद करणे हे बँकांचें काम आहे. फक्त हें देणें सोन्यांत द्यावयाचे असल्या- मुळे, बँकाजवळच्या नोटा व रुपये घेऊन त्यांना पौंडांचा ड्रेफ्ट देणे एवढेच सरकारचें काम आहे. जेवढ्या नोटा व जेवडे रुपये चलनांतून काढतां येतील, तेवढा सोन्याचा निधि ठेविला मणजे झालें. उदाहरणार्थ, चलनांतून ३० कोटि रुपये काढतां बेतील असा अंदाज असल्यास २ कोटि पौंडांचा निधि इंग्लंडांत असला झणजे काळजी करण्याचें कारण नाहीं.
 हा अंदाज आतां आपण विशेष बारकाईनें करूं. एकंदर चलनांत १९९२ साली अदमासे १७५ कोटि रुपये खरोखरी चलनांत होते असें पूर्वी (प्रकरण ३ पहा.) सांगितलेच आहे. त्यामध्ये आणखी २५ कोटि रुपये नवीन पाडलेले वालून महा-
-