पान:रुपया.pdf/112

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १०९ ]

सरकारी खजिन्यांत राहतात; परंतु लोकांजवळ आलेल्या पौंडां- पैकीं कांहीं चलनांत राहतात व कांहींच्या मोबदला लोक रुपये मागतात. १९०९ पासून १९१३ पर्यंतच्या चार वर्षांत नोटांच्या निधींत एकंदर नवीन ३० कोटींचे पौंड आले. याचा अर्थ असा की, हे पौंड पटवून लोकांनी नोटा किंवा रुपये नेले. याची सरासरी काढली असतां दरसाल ७२ कोटि होते; परंतु कधी कधीं रूपयांची टंचाई न पडतां, उलट रुपये सरकारास देऊन लोक पौंड नेतात. याबद्दल थोडीशी कसर काढली तरीसुद्धां पौंडांच्याकरितां दरसाल अदमासे ५ कोटि रुपये लागतील असे धरून चालण्यास हरकत नाही. एकूण हुंड्यांचे १६ कोटि व पौंडांबद्दल १ कोटि (= २१ कोटि ) इतकी शिल्लक जानेवारीच्या आरंभी आवश्यक अशी किमान मर्यादा आहे. यांत ६ कोटि जास्त मिळवून २७ होतात. एवढा रुपयांचा निधि असला झणजे पुरे आहे.
 आतां सोन्याचा निधि किती असला पाहिजे याचा तपशीलवार विचार करूं. निधीचा आकार ठरविण्यापूर्वी त्या निधीचा उद्दिष्ट हेतु काय आहे हे ठरविले पाहिजे. एका पक्षाचें ह्मणणे असे आहे की, सोन्याच्या निधीचा उद्देश फक्त रुपये दिले असता कोणत्याही वेळीं सोनें देणे इतकाच आहे. सुवर्णसंलग्याच्या व्याख्येप्रमाणें हें चलन सुवर्णाशी संलग्न असले पाहिजे. ठराविक दरानें वाटेल तेव्हां रुपये दिल्यास, सोनें अथवा पौंड मिळाले पाहि