पान:रुपया.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १०८ ]
पहिल्या मार्गाने स्वस्त भावाने खरेदी करता येते; परंतु त्यामध्ये सरकारी अधिका-यांवर टपका येण्याचा संभव असतो. याकरित। दुसरा मार्ग हाच उत्तम आहे. एक दोन कोटींचे रु निधीत ठेवावें ब अडचण पडल्यास बाजारभावाने लागेल तेवढे खरेदी करावे. शिवाय हल्ली रुपये चलनांत इतके झालेले आहेत की, सरकारजवळ २०।२५ कोटि रुपये नेहमी राहतील व नवीन रुपये पाडण्याची आवश्यकता राहणार नाही. नोटांचे चलन जास्त लोकप्रिय झाले ह्यणजे हुंड्यांच्या ऐवजी रुपये न मागतां लोक नोठांवर व्यवहार करू लागतील.
  आतां रुपे वाटेल तेव्हा मिळेल असे धरून चालले तरी त्याचे रुपये पाहिजे तितक्या जलदीने पाडतां येतील किंवा नाहीं है पाहिले पाहिजे. जास्त वेळ काम केल्याशिवाय येथील टांकसाळींत एका महिन्यांत २३ कोटि रुपये पडू शकतात व अधिक वेळ काम केल्यास ४ कोटींपर्यंत पडू शकतात. डिसेंबर महिन्यांत नेहमीच्या अंदाजाप्रमाणे जी किमान मर्यादा असते, त्यापेक्षां ५।६ कोटि रुपये जास्त असले झणजे साधारणरीत्या धास्ती बाळगण्याचे काम नाही. गेल्या दहा वर्षांच्या अनुभवावरून असे दिसते कीं, जानेवारीपासून मेपर्यंतच्या तेजीच्या मोसमांत सरासरीने स्टेट सेक्रेटरी १५।१६ कोटींच्या हुंड्या विकतो. इतके रुपये खजिन्यांत अवश्य ठविले पाहिजेत दुसरी बाब पौंडांची : सरासरीने एका वर्षात १०।१५ कोटींचे पौंड येतात असे व्यापाराच्या सरकारी अहवालावरून दिसून येईल. यापैकी कांहीं पौंड